दिल्ली चर्चच्या फादरने केलेल्या आवाहनावरून वादळ उठले आहे. ते सर्वत्र उपलब्ध असल्याने त्यावर लिहीत नाही. परंतु या निमित्ताने तीन मुद्दे -
१) राजकारणात धर्माची सरमिसळ करू नये अशी sermons देणारे यावेळीही बिळात लपून स्वतःची निर्लज्जता आणि ***** दाखवण्यात कमी पडणार नाहीत.
२) या विषयावरील चर्चेत कुण्या 'फादर शंकर' यांनी प्रदूषणाचा मुद्दा आणला. तो का हे अजूनही समजले नाही, पण हिंदूंची अंत्यसंस्काराची दहन पद्धती आणि होमहवने प्रदूषण पसरवतात, असा त्यांचा मुद्दा. चर्चला प्रदूषणाची एवढी चिंता असेल तर त्यांनी जगभरातील सगळ्या ख्रिश्चनांना त्वरित श्वास बंद करायला सांगावे. म्हणजे प्रतिक्षणी वातावरणात मिसळणारा कार्बन डायऑक्सईड कमी होईल. त्यांचा गाड्यांचा आणि सौंदर्य प्रसाधनांचा वापर कमी होऊन प्रदूषण कमी होईल. अन पुढे जाऊन सगळ्या हिंदूंनी ठणकावून सांगावे - हे जग प्रदूषणात बुडून नष्ट झाले तरी आम्ही दहनक्रिया आणि होमहवन सोडणार नाही.
३) हिंदू विचारक, कार्यकर्ते, चिंतक, धर्मनेते यांनी तत्वज्ञानाचे विश्वव्यापी महाभारत सुरू करून; ख्रिश्चन धर्माची तत्व, धारणा, दृष्टी, गृहीतके, संकल्पना कशा निरर्थक, चुकीच्या आहेत; धर्ममत म्हणून त्यांच्या असलेल्या मर्यादा, अध्यात्मिक उन्नतीसाठी नसलेला त्याचा उपयोग; या साऱ्याची आग्रही सार्वजनिक चर्चा आणि उहापोह करावा. नुसतेच भजनपूजन आणि दोन चार गाड्या अन घरे मिळवण्यासाठी ईश्वराची प्रार्थना करण्याच्या हलक्या प्रतीच्या वृत्तीचा त्याग करावा. काळाच्या गरजेनुसार धर्मचर्चा करावी.
- श्रीपाद कोठे
२२ मे २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा