सोमवार, २९ मे, २०२३

सत्ता

भर्तृहरीने कालातीत सत्य सांगून ठेवलं आहे. सत्ता (राजनीती हा त्याचा शब्द) वारांगनेसारखी असते. चांगलं किंवा वाईट हा तिचा स्वभाव नसतो, धोरण असतं. जगातल्या कोणत्याही भौगोलिक प्रदेशातील, कोणत्याही काळातील, कोणत्याही प्रकारची, कोणत्याही हातातील सत्ता याला अपवाद नसते. मुळातच अगदी एका व्यक्तीचा विचार केला तरी 'सत्ता गाजवणे', 'सत्ताकांक्षा' हीच प्रामुख्याने त्याच्या almost सगळ्या व्यवहारांच्या मुळाशी दिसते. प्रश्न हा की, त्यातून माणसाला बाहेर कसं काढायचं? व्यक्ती म्हणून आणि समूह म्हणून सुद्धा. अध्यात्म म्हणजे या सत्ताकांक्षेतून माणसाला बाहेर काढणे. अन हे काम संत आणि संतच करत असतात.

- श्रीपाद कोठे

३० मे २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा