बुधवार, २४ मे, २०२३

राजकारण

लोकांना राजकारणाचं अमाप कौतुक असतं. दिवसातला किती वेळ राजकारण चिवडण्यात घालवतात कोणास ठाऊक. पण राजकारण खरंच समाजाचं भलं करू शकतं का? असे अनेक विषय आहेत की ज्यात राजकारण मीठाचा खडा टाकत असतं. उदा. जात आणि आरक्षण. या दोन्ही विषयांवर कितीही चोथा केला तरी हे दोन विषय मार्गी लागू शकत नाहीत याचं एकमेव कारण आहे राजकारण. ताजा मुद्दा आहे जातीवर आधारित जनगणना. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जातीवर आधारित जनगणनेसाठी कंबर कसली आहे. अन आत्ता बातमी आहे की, भाजप बिहारमध्ये जातीवर आधारित जनगणनेला पाठिंबा देऊ शकतो. वास्तविक जी 'जात' नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही त्यासाठी किती आटापिटा. अन त्याला कारण राजकारण. मग त्यावरून कितीही वाद होवोत, संघर्ष होवोत, वितुष्ट येवो, डोकी फुटोत. कोणाला त्याचं काहीही नाही. अन 'राजकारणाने आपली मर्यादा सोडू नये' हे ठणकावण्याची आपली शक्ती तर समाज केव्हाच गमावून बसला आहे.

- श्रीपाद कोठे

२४ मे २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा