आज तुकडोजी महाराजांची जयंती आहे. त्यांचा रा. स्व. संघाशीही संबंध आला होता. १९४० च्या नागपूरच्या संघ शिक्षा वर्गात एक दिवस रात्री त्यांच्या खंजिरी भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. निल सीटी शाळेत झालेल्या या भजनाला संघ संस्थापक डॉ. हेडगेवार उपस्थित होते. गोळवलकर गुरुजी या वर्गाचे सर्वाधिकारी होते.
३० डिसेंबर १९४३ च्या ब्रिटिश सरकारच्या गुप्तचर अहवालातही तुकडोजी महाराज व संघ यांच्या संबंधांचा उल्लेख आहे. संघ आपल्या कार्यवाढीसाठी तुकडोजी महाराजांची मदत घेत असल्याचे त्यात म्हटले होते.
१९४८ च्या गांधीजींच्या हत्येनंतर मात्र संघ व तुकडोजी महाराज यांच्या संबंधांबाबत बरेच समज गैरसमज दोन्ही बाजूंना झाले होते.
परंतु १९६४ साली गोळवलकर गुरुजींच्या पुढाकाराने विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली त्यावेळी त्यात त्यांचा सहभाग होता. मुंबईतील पवईच्या चिन्मय आश्रमात झालेल्या विहिंप स्थापना बैठकीला ते उपस्थित होते.
- श्रीपाद कोठे
३० एप्रिल २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा