चांगली माणसं दोन प्रकारची असतात. चांगल्यासाठी चांगली असणारी. अन स्वार्थासाठी चांगली असणारी. स्वार्थासाठी चांगली असणाऱ्या माणसांना चांगल्यासाठी चांगली असणारी माणसं चालत नाहीत, आवडत नाहीत, पटत नाहीत, सहन होत नाहीत. स्वार्थासाठी चांगली असणारी माणसं, चांगल्यासाठी चांगले असणाऱ्यांचा द्वेष करतात, त्यांना पाण्यात पाहतात, त्यांचा दुस्वास करतात, त्यांचा पाणउतारा करतात, त्यांना कमी लेखतात, त्यांना हसतात, त्यांची वाईट मस्करी करतात, त्यांना टोमणे मारतात. जगात स्वार्थासाठी चांगली असणारी माणसं जास्त आहेत.
- श्रीपाद कोठे
२६ जून २०२१
श्रीपादजी, जगात चांगल्यासाठी चांगल्या असणार्या माणसांपेक्षाही श्रेष्ठ असणारी माणसांची वर्गवारी राहू शकते. ज्ञानदेवांनी पाप पुण्याची पुढील प्रमाणे वर्गवारी केली आहे. १.पुण्यात्मक पाप २. पापात्मक पाप व ३. शुध्द पुण्य . आपण जी चांगली माणसे म्हणता,ती पुण्यात्मक पाप करणारी आहेत,जी स्वर्गात जाण्यास पात्र ठरतील, पण जी शुध्द पुण्य करणारी आहेत ती मोक्ष मिळवितील .म्हणून ती सर्वश्रेष्ठ ठरतील. तेथे कर्माच्या कर्तृत्वाचा विवेकाने (ज्ञानयोग ) व भोक्तृत्वाचा(कर्मयोग) त्याग करावयाचा आहे.दुसरे असे की चांगल्या माणसांच्या चांगल्या कामातही एक सूक्ष्म स्वार्थ असतोच की. म्हणूनच बृह. उपनिषदात म्हटले आहे,’आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति’. सर, थोडं जास्तच लिहून गेलो त्याबद्दल क्षमस्व!
- माधव देशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा