सध्या रस्ते, वाहतूक यांची पुष्कळ चर्चा होते आहे. स्वाभाविकच सीट बेल्ट, हेल्मेट यांचीही चर्चा आहे. सहज एक दोन गोष्टी मनात आल्या.
- बेल्ट न लावता, हेल्मेट न घालताही बहुसंख्य लोक सुखरूप आहेत, अन् सुखरूप गाड्या चालवतात.
- शहरात एखादा अपघात वगळल्यास, वेगच कमी राहत असल्याने जीव गमावण्याचे प्रमाण कमी असतेच. मग बेल्ट, हेल्मेट यांचा अमर्याद आग्रह शहरात/ गावात असावा का?
- रस्ते अपघातात जे जीव जातात ते वाईटच पण, अपघातांपेक्षा वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न नाही का? अपघातात चार जीव जात असतील तर चारशे लोकांचे वाहतूक कोंडीमुळे किरकोळपासून गंभीरपर्यंत नुकसान होते. शिवाय मनुष्यतास, मानवी ऊर्जा, मानवी मन, पेट्रोलियम ऊर्जा यांच्या स्वरूपात राष्ट्राचे फार मोठे नुकसान होते.
- बाकी रस्त्यांची स्थिती, सिग्नल इत्यादी इत्यादी इत्यादी आहेच.
- भर कशावर हवा? आग्रह कशासाठी हवा?
- श्रीपाद कोठे
१० सप्टेंबर २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा