बहुतेक २००६ साल असेल. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नाशिक येथील मुख्यालयात होतो. पत्रकारिता अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू होते. फावल्या वेळात गप्पाही होत. वृत्तवाहिन्या ही त्यावेळी नवीन गोष्ट होती. बहुतेक सगळ्याचं मत होतं की, आपल्या वृत्तवाहिन्या या अमेरिकन वृत्तवाहिन्यांची copy आहेत किंवा copy करतात. इत्यादी. मात्र पुढेही हेच सुरू राहील का यावर दोन मते होती. एक मत होतं, असंच सुरू राहील. यावर आतापासून अंकुश हवा. दुसरं मत होतं, हे कमी होत जाईल. आजच्या वृत्तवाहिन्या पाहताना, विशेषतः त्यावरचे debate नावाचे तमाशे पाहताना, पहिलं मत बरोबर ठरल्याचं वाटतं. समाज आणि माणसाचं मानस नासवण्यात या वृत्तवाहिन्यांचा मोठा वाटा आहे.
- श्रीपाद कोठे
१३ ऑगस्ट २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा