रविवार, ३० ऑक्टोबर, २०२२

एक दिवा, एक मिनिट

दिवाळी सुरु झाली. येथून पुढे पाच दिवस सगळीकडे आनंद, उत्साह राहील; अन दिवेही राहतील. संध्याकाळी दिवे लावताना एक दिवा अधिकच लावू या आणि प्रार्थना करू या मिनिटभर सीमेवरील जवानांसाठी, शेतात राबणार्या शेतकर्यासाठी, आपल्याकडे काम करणार्या गडी माणसांसाठी, आपल्याशी संबंधित श्रीमंत- गरीब- स्त्री- पुरुष- वृद्ध- समवयस्क- बालके- मित्र- शत्रू- आपल्याला हसवणारे- आपल्याला रडवणारे- आपल्याशी सहमत- आपल्याशी असहमत- सगळ्यांसाठी, आपल्याला अज्ञात असणार्या सगळ्यांसाठीही, सगळ्या देशांसाठी, सगळ्या समाजांसाठी, पशु- पक्षी- वनस्पती- संपूर्ण सृष्टीसाठी, पंचमहाभूतांसाठी, आम्हाला अज्ञात सृष्टीसाठी, आमच्या पूर्वी पृथ्वीवर राहून गेलेल्यांसाठी, आमच्यासोबत राहणार्यांसाठी, आमच्यानंतर राहतील त्यांच्यासाठीही; अगदी सगळ्या सगळ्यांसाठी आणि सगळ्या सगळ्यासाठी. आपल्या कोणत्याही कृतीला शारीरिक, आर्थिक, भौगोलिक मर्यादा असतात. मनाला मात्र मर्यादा नसते. दिवाळीनिमित्त त्याला खर्या अर्थाने सर्वव्यापी करू या. ईशवादी असलो तरीही करू या, इहवादी असलो तरीही करू या. दिवाळीचे पाच दिवस एक दिवा आणि एक मिनिट आपल्यातील माणसासाठी आणि आपल्यातील ईश्वरासाठी देऊ या.

- श्रीपाद कोठे

३१ ऑक्टोबर २०१३

सरदार

संघावर बंदी घातली तरीही सरदार पटेल यांच्याबद्दल श्रद्धा आणि आदर ठेवणारे संघ- भाजप समजदार, विचारी, द्वेष न करणार्या भारतीय संस्कृतीचे पाईक; की सरदार आमचेच म्हणणारे वा सरदार आणि भाजपा- संघाचा काय संबंध असा प्रश्न विचारणारे महाभाग समजदार, विचारी, द्वेष न करणार्या भारतीय संस्कृतीचे पाईक? मतभेद असतील ते स्वच्छपणे मांडणे आणि तरीही गुण आणि कर्तृत्व याविषयी आदर, श्रद्धा, कौतुक आणि नम्रता बाळगणे; हा उमदेपणा की; ढोंगीपणाने आणि छाद्मिपणाने वागणे म्हणजे उमदेपणा?

- श्रीपाद कोठे

३१ ऑक्टोबर २०१३

भ्रम उत्पन्न करणारे काही शब्दप्रयोग

१) विरोधी पक्ष- नावातच विरोधी असल्याने विरोध करणे अपरिहार्य. मग समाजाच्या, देशाच्या विषयांचीही विभागणी तुमचे- आमचे अशी होते. त्याऐवजी सत्ताधारी आणि अन्य असा शब्दप्रयोग का नको?

२) युती सरकार/ आघाडी सरकार- दोन्ही शब्दात सौदा अध्याहृत आहे. त्यापेक्षा संयुक्त सरकार का नको?

३) दलितांवर अत्याचार- अत्याचार झालेली व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह दलित असू शकतात, पण अत्याचार दलित म्हणून झाला असतो का? प्रत्येक वेळी तसेच असेल असे नाही.

४) महिलांवर अत्याचार- अत्याचार झालेली व्यक्ती महिला असू शकेल, पण महिला आहे म्हणून अत्याचार झाला हे प्रत्येक वेळी असेलच असे नाही.

५) अमुक भाषिकावर अत्याचार- अत्याचार झालेली व्यक्ती अमुक भाषेची असू शकते, पण अत्याचार ती व्यक्ती त्या भाषेची आहे म्हणूनच झालेला असेल असे नाही.

- श्रीपाद कोठे

३१ ऑक्टोबर २०१४

आशावाद

'वेदांत दर्शनास आत्यंतिक निराशावादाने प्रारंभ होतो व त्याची परिसमाप्ती खऱ्या आशावादात होते. आम्ही इंद्रियांवर आधारलेला आशावाद नाकारतो हे खरे. तथापि इंद्रियातीत अनुभवांवर आधारलेला खराखुरा आशावाद आम्ही प्रतिपादतो. आज जगात आढळणारा आशावाद आपल्याला इंद्रियांच्या योगे विनाशाप्रत खेचून नेईल.'

- स्वामी विवेकानंद

काही गोष्टींचा मुळातून विचार करायला हवा आहे. आशावाद ही पण त्यातली एक. त्यासाठी विवेकानंदांचे हे प्रतिपादन दिशादर्शक आहे. विवेकानंदांचे बहुसंख्य भक्त, अनुयायी किंवा त्यांना मानणारे सुद्धा; विवेकानंदांच्या विचारांच्या आधारे त्यांनी त्याज्य ठरवलेला आशावाद मांडण्याचा प्रयत्न करतात. असे पुष्कळ बाबतीत होते. त्यासाठी थोडे सूक्ष्म अध्ययन वाढीला लागायला हवे. दिसायला छोट्या पण परिणाम मोठ्या करणाऱ्या या बाबी असतात.

- श्रीपाद कोठे

३१ ऑक्टोबर २०१९

संघाचे आवाहन

रामजन्मभूमीचा निकाल सगळ्यांनी खुल्या मनाने स्वीकारून सौहार्द कायम राखण्याचे आवाहन रा. स्व. संघाने केले आहे. हिंदू समाजासह सगळ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देणे; आपली भाषा, भाव, अभिव्यक्ती, आनंद अथवा निराशा संयमितपणे प्रकट व्हावी ही अपेक्षा त्यातून व्यक्त झाली आहे. संघासोबत अन्य राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी देखील अशी समंजस भूमिका समाजासमोर मांडून तसे आवाहन करायला हवे. त्याने एक सार्वत्रिक सौहार्दाचे वातावरण तयार होईल.

- श्रीपाद कोठे

३१ ऑक्टोबर २०१९

शनिवार, २९ ऑक्टोबर, २०२२

सोयीस्कर

काही वर्षांपूर्वीचा प्रसंग. मित्राच्या वडिलांचा स्वर्गवास झाला होता. अंत्यसंस्कारासाठी स्मशानात गेलो होतो. सगळे विधी वगैरे झाले. शेवटी जराजर्जर शरीराला भस्मीभूत करणाऱ्या त्या पावन अग्नीत एकेक गोवरी टाकत सगळे परतू लागले. निघताना मृताला तिलांजली द्यायची आणि नळावर हातपाय धुवून बाहेर पडायचे अशी प्रथा आहे. काही जणांचे हातपाय धुवून झाले आणि नळाचे पाणी गेले. आता काय याची चर्चा सुरु झाली. तिथे एक हापशी होती तिकडे काही जणांनी मोर्चा वळवला. स्वाभाविक वेळ लागू लागला, जरा गर्दी झाली. त्यावेळी आमच्या कार्यालयातील एक इलेक्ट्रोनिक इंजिनिअर म्हणाला- `राहू द्या, नाही धुतले हातपाय तर नाही. घरी जाऊन आंघोळ करतोच आपण.' त्याचे म्हणणे खरेच होते. युक्तिवाद पण योग्य होता. पण तो तिथेच थांबला नाही. आपल्या म्हणण्याचा तर्क देत तो म्हणाला- `सब कुछ भगवान ही तो है. हम लोग भी फिजूल बातो मे उलझते है.' लगेच मनात घुसळण झाली. आपण कोणत्याही तत्वाचा किती सोयीस्कर अर्थ लावतो ते जाणवलं. मनातून सहज एक प्रश्न ओठांवर आला. त्याला म्हटले- `मित्रा, सगळे भगवान आहे हे ठीक. पण गेल्या महिन्यात तुम्हा इलेक्ट्रोनिक इंजिनिअरच्या पदोन्नतीचा प्रश्न आला होता तेव्हा तुला हे का नाही रे आठवले? तेव्हा का भांडलास ती पदोन्नती तुलाच मिळावी म्हणून.' स्वाभाविकच त्याने फक्त डोळे वटारून पाहिले आणि तो निघून गेला.

- श्रीपाद कोठे

३० ऑक्टोबर २०१५

जागल्या

कोणत्या तरी एका सोड्याची (दारूची जाहिरात करता येत नाही म्हणून सोड्याच्या नावाखाली) जाहिरात असते- कोणीतरी मुलीचा विनयभंग करण्याच्या तयारीत असतो. अन दुसरा कोणी मोठ्याने ओरडतो. तो ओरडल्याने सारेच सावध होतात आणि छेड काढणाऱ्याला मान खाली घालून निघून जावे लागते.

मी तो ओरडणारा आहे. विनाकारण हिंदूंचा मानभंग करणारे, हिंदूंना कमी लेखणारे, कमी दाखवणारे, उदारतेच्या नावाने हीनत्व जपणारे अन पसरवणारे, विविध कारणांनी हिंदुत्वाचा विरोध करणारे, हिंदू- हिंदुत्व- इत्यादीवर स्वत:ची मते लादून बौद्धिक दहशतवाद पसरवणारे, काहीही विचार करणे- समजून घेणे- या भानगडीत न पडता; हेकेखोरपणा करणारे... या सगळ्यांपासून सावध करण्यासाठी ओरडणारा मी जागल्या आहे.

खूप दूर जाण्याची गरज नाही. माझ्याच डझनावारी तर्कांना, माहितीला, आक्षेपांना बगल देणारे, आत्यंतिक असहिष्णू लोक मी रोज अनुभवतो. हे वाचाळ तोंडात मिठाची गुळणी धरून कसे बसतात याचा मला भरपूर अनुभव आहे. फक्त फेसबुकबद्दल बोलायचे तरीही अनेक उदाहरणे देता येतील. बाकी वेगळेच. अशा ढोंगी, बेजबाबदार लोकांपासून सावध करण्यासाठी मी ओरडत राहणार आहे. माझ्याशी सहमत असणाऱ्यांनाही माझे जागल्या होण्याचे आवाहन आहे.

- श्रीपाद कोठे

३० ऑक्टोबर २०१५

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

बोलणे

एक कुरियरचा `डिलिव्हरी बॉय' पार्सल देण्यासाठी एका घरी गेला. घरी फक्त आजोबा होते. त्यांना कमी ऐकू येते. तो मुलगा त्यांच्याशी अशा काही गुर्मीत आणि थाटात बोलला की बस. मला लक्षात आले आणि मी त्याला टोकले. मी त्याला म्हणालो- नीट बोलावे. त्यावर त्याने दिलगिरी व्यक्त करणे दूरच, हुज्जत घालणे सुरु केले. वरून त्याचे पालुपद- मला काय माहीत त्यांना ऐकू येत नाही ते. मी म्हटले- अरे माहिती असण्याचं काय कारण. ते म्हातारे आहेत दिसत नाही का? आणि म्हातारे असो वा तरुण, पुरुष असो वा स्त्री; नीटच बोलले पाहिजे ना? अनेकदा तर आपणही असेच करतो- मला माहीत नव्हते. मी काय मुद्दाम केले का? वगैरे. परमेश्वराने सगळ्या गोष्टी सांगून तर जन्माला घातलेले नाही ना? परिस्थिती पाहून ती समजून घेण्याची वृत्ती; शिकण्याची, विकसित करण्याची आपली किती तयारी असते?

- श्रीपाद कोठे

२९ ऑक्टोबर २०१४

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

अनुकरणीय

आमच्या जवळ एक सुपर मार्केट आहे. तिथे कधीही जा. श्रुतीमधुर भजने, गाणी, अभंग सुरूच असतात. स्पष्ट ऐकू येतील पण दोघांच्या बोलण्यात किंचितही अडथळा येणार नाही एवढ्या आवाजात. वाटलं तर दुर्लक्ष करा, वाटलं तर ऐका. त्यामुळे वातावरण पण छान असतं. आज मात्र बासरी वाजत होती. आत पाय ठेवताच हंसध्वनीचे स्वर कानावर पडले. गुणगुणतच सामान घेतलं. काउंटरवर बिल तयार झालं. त्या मुलीला विचारलं - काय वाजतं आहे? ओशाळून म्हणाली - नाही. तिला म्हटलं - तुझी परीक्षा नाही घेत. सहज विचारलं. याला म्हणतात राग हंसध्वनी. पेमेंट केलं अन पलीकडे बसलेल्या मॅनेजरकडे गेलो. त्यांना म्हटलं - तुम्हाला धन्यवाद. इतकी छान बासरी लावल्याबद्दल. त्यांनाही आनंद झाला. त्यांच्या दुकानाच्या या वेगळेपणाची दखल घेतल्याचा. म्हणाले - हो. छान आहे. श्रीकृष्ण वाजवत ती बासरी आहे. मनात म्हटलं - यांना आवड आहे. रसिक आहेत पण माहिती नाही. असो. त्यात काय? प्रत्येकाला शास्त्र माहिती असायलाच हवं असं कुठे आहे. त्यांनाही सांगून टाकलं. शास्त्रीय संगीतातील हा राग हंसध्वनी आहे. वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने कॉलर सरळ केली. सगळीकडेच, किमान जिथे जिथे शक्य असेल तिथे; असं सुमधुर काही वाजवायला, अनुकरण करायला काय हरकत आहे. एक ट्रेंडच सुरू व्हावा. सततच्या संस्काराने काही काळाने एक रसिक, लयबद्ध, तालबद्ध समाजही यातून तयार होऊन जाईल.

- श्रीपाद कोठे

२८ ऑक्टोबर २०२१

दुर्गा पुजेवर बंदी

पश्चिम बंगालच्या वीरभूम जिल्ह्यातील नलवाडी गावात दुर्गापूजा करण्यावर गेल्या चार वर्षांपासून बंदी आहे. गावकरी वारंवार पोलिसांकडे परवानगी मागतात आणि पोलीस मात्र परवानगी देत नाहीत. आणि परवानगी न देण्याच्या अधिकृत पत्रात `सरकारी अनुमती नाही' असे नमूद करतात. पश्चिम बंगालच्या तत्कालीन कम्युनिस्ट शासनाने १२ वर्षांपूर्वी एक आदेश काढून नवीन दुर्गापूजा मंडळांवर बंदी घातली होती. त्या आदेशाचा हवाला यासाठी दिला जातो. मुख्यमंत्री ममता बानर्जी, बंगालचे कम्युनिस्ट, देशभरातील कॉंग्रेस आणि पुरोगामी, धर्मनिरपेक्ष यावर काहीही बोलत नाहीत. १२ वर्षे ना दिवट्या प्रसार माध्यमांना याकडे लक्ष द्यावेसे वाटले ना अन्य कोणाला.

ही धर्मनिरपेक्षता? हे घटनेने दिलेले धार्मिक स्वातंत्र्य? हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य? ही घटनेने दिलेल्या सप्तस्वातंत्र्याची मुस्कटदाबी नाही? कोण कोण राजीनामे देणार या कारणासाठी? कपोलकल्पित भयापोटी राजीनाम्यांचा आचरटपणा करणारे किमान निषेधाचा एखादा शब्द तरी तोंडातून काढतील का?

- श्रीपाद कोठे

२८ ऑक्टोबर २०१५

परस्परानुकुल

परस्परावलंबीत्व याऐवजी परस्परानुकूल या शब्दाचा उपयोग व्हावा, वाढावा असं वाटतं. परस्परावलंबीत्व या शब्दाने अवलंबून राहणे, अवलंबून असणे, अवलंबून ठेवणे, आपल्या भल्या वा वाईटासाठी अन्य कोणी/ अन्य काही जबाबदार असण्याची भावना, अवलंबित्व वाढवण्याची प्रवृत्ती, अडवणूक वा गैरफायदा, पारतंत्र्य; अशा सगळ्या बाबी कळत वा नकळत येतात. याउलट परस्परानुकूल या शब्दाने जबाबदारी, साद- प्रतिसादाची भावना, त्रुटींवर मात करण्याचा विचार, अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न, अडवणूक वा गैरफायदा याऐवजी पूरकतेचा विकास, व्यक्तीप्रतिष्ठा, समजुतदारी, जाणिवांचा विस्तार; याकडे लक्ष पुरवले जाते.

- श्रीपाद कोठे

२८ ऑक्टोबर २०१९

मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०२२

प्रेरणा आणि नियंत्रण

वादाचे शमन प्रतिवादाने होत नाही. त्याने केवळ शक्तीचा, बुद्धीचा ऱ्हास होतो. वादाचे शमन विचाराने होते.

कट्टरतेचे शमन प्रति कट्टरतेने होत नाही. त्याने केवळ त्रास आणि वेदना वाढते. कट्टरतेचे शमन विवेकाने होते.

विचारांची आणि विवेकाची वाढ सांस्कृतिक उन्नतीने होते. त्यासाठी आतल्या माणसाला साद घालावी लागते. त्यालाच प्रेरणा जागवणे म्हणता येईल.

आधुनिक समाजव्यवस्था जीवनाच्या प्रेरणा जागवण्याचा प्रयत्न करत नाही. जीवनाचा व्यवहार नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे समस्या चक्रवाढ गतीने वाढतात.

- श्रीपाद कोठे

२६ ऑक्टोबर २०२१

वंश

वंश, वंशवाद, वांशिकता, वंशवर्चस्व, वंशशुद्धी, वंशसातत्य, वंशप्राचीनता; अशा विषयांची बरीच चर्चा वेळोवेळी होत असते. यात दोन प्रकार आहेत. एकात वंश शब्द 'घराणं' या अर्थाने वापरला जातो. दुसऱ्यात वंश शब्द 'मनुष्य समूह' या अर्थाने वापरला जातो. जसे आर्य, द्रविड, मंगोल इत्यादी. इंग्रजीत ज्याला race म्हणतात त्या अर्थाने. दोन्ही प्रकारच्या चर्चा एका मर्यादेतच relevant असतात. त्यात खूप तथ्य असतं असं नाही. तो वेगळा विषय पण एक प्रश्न मनात येतो. हे सगळे वंश कुठून आले असतील. सगळ्याच्या सगळ्या वंशाच्या आद्य जोड्या वेगवेगळ्या ठिकाणी आकाशातून तर पडल्या नसणारच. किंवा जमिनीतून उगवल्या नसणार. म्हणजेच काही ना काही सरमिसळ प्रक्रिया घडली असणारच. याचाच अर्थ वंशाचे मूळ गवसणे अशक्य. मग जिथे मूळच हाती नाही तिथे या चर्चांना काय अर्थ राहतो? ते सुद्धा मानवजात आद्य जोडीतून विकसित झाल्याचं गृहितक स्वीकारलं तरंच. मानवाची उत्पत्ती आद्य जोडीविना झाली असेल आणि जोडी ही नंतरच्या प्रक्रियेत विकसित झाली नसेल, हे तरी कशावरून?

- श्रीपाद कोठे

२६ ऑक्टोबर २०२१

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०२२

औषध खरेदी

औषधांच्या दुकानात गेलो होतो. शेजारी एक बाई येऊन उभ्या राहिल्या. बहुधा आधी येऊन गेल्या होत्या. दुकानदाराशी त्यांचा संवाद झाला -

- ते केवढ्याचं आहे?

- अमुक एवढ्याचं.

- मग ते राहू द्या. हे द्या.

*********************

हे भगवती हे बदलू दे. त्यासाठी शक्ती, बुद्धी, युक्ती, कौशल्य, आशीर्वाद दे... अन ते कायम असू दे...

***********************

दीपावलीचे शुभचिंतन.

- श्रीपाद कोठे

२५ ऑक्टोबर २०१९

राष्ट्रगीताचा सन्मान

राष्ट्रगीताचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रगीत म्हटले जात असताना वा वाजवले जात असताना, त्याच्या सन्मानार्थ उभे राहण्याची भावना आणि वृत्ती वाढायला हवी हे खरेच आहे. आज ती नाही हेही योग्य नाही. मात्र ते कायद्याने बंधनकारक असावे का? यावर एकांगी आग्रह योग्य नाही. ते कायद्याने बंधनकारक करण्यापेक्षा, जे राष्ट्रगीताचा सन्मान करायला उभे राहत नाहीत, ते चुकीचे वागतात, बेजबाबदार आहेत, संवेदनशील नाहीत; असे सामाजिक वातावरण अधिकाधिक तयार व्हावे. अशा लोकांना कानकोंडे होईल असं वातावरण तयार करावं. आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे- आज जसे देवदेवता, संत, धार्मिक प्रतिके यांच्या प्रतिमांचा बाजार झाला आहे आणि त्यांचे महत्व, गांभीर्य कमी झाले आहे; तसे राष्ट्रीय प्रतिकांचे व्हावे का? या प्रश्नाचाही विचार व्हावा. राष्ट्रीय प्रतिकांची sanctity राखावी हे जसे खरे तसेच, त्यासाठी त्यांचा वापर मर्यादित आणि मर्यादेत व्हावा हेही खरेच नाही का? राष्ट्रगीतासाठी उभे करून राष्ट्रभक्ती उत्पन्न करण्याऐवजी, राष्ट्रभक्तीपोटी राष्ट्रगीताचा सन्मान राखला जावा.

- श्रीपाद कोठे

२५ ऑक्टोबर २०१७

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०२२

काव्यहोत्र

सध्या बिंदीशिवाय (😃) आणखीन एक विषय चर्चेत आहे. 'काव्यहोत्र' हा शब्द. निमित्त आहे विदर्भ साहित्य संघाने आयोजित केलेल्या दीर्घ कवितांवरील कार्यक्रमाचे. त्या कार्यक्रमाला शीर्षक दिले आहे - 'काव्यहोत्र'. हे अग्निहोत्र सारखे आहे. त्यामुळे वैदिक (???) संस्कृतीला मनापासून विरोध असणाऱ्यांचा त्याला आक्षेप आहे. या काव्यहोत्रात कवितांच्या समिधा जाळायच्या का अशी चर्चाही आहे. त्यानिमित्ताने माझं मत.....

मला वाटतं, अग्निहोत्र म्हणजे अग्नीचं व्रत. नियमित, न चुकता अग्नीची उपासना, अग्नी विझू न देणे असा त्याचा आशय. अग्नीहोत्रात अग्नीची आहुती नसते. समीधांची असते. त्यामुळे काव्यहोत्रात काव्याची आहुती असा अर्थ शक्य नाही. अनुभव, अध्ययन, साधना यांची आहुती देऊन काव्याची उपासना करून कवितेला प्रसन्न करून घेणे, कवितेची ज्योत विझू न देणे; असा अर्थ लावता येईल. ज्यांनी हा शब्द वापरला त्यांना अभिप्रेत काय हे माहिती नाही.

- श्रीपाद कोठे

२३ ऑक्टोबर २०२१

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

आरोग्य

शरीराच्या आरोग्यासाठी हृदय, फुफ्फुसे, जठर, मूत्रपिंड; असं सगळं सुस्थितीत असावं लागतं. त्यांच्यावरच सगळं अवलंबून. पण ही सगळी मंडळी कोणाला दिसत नाही. त्यांचा साजशृंगार नसतो. त्यांची छायाचित्रे कोणी लावत नाही. मुख्य म्हणजे आपल्या सवयी, आपल्या आवडी, आपल्या इच्छा इत्यादी इत्यादी या महत्त्वाच्या मंडळींकडे दुर्लक्षच करतात. मग झटका बसला की धावपळ होते. सगळं ठीकठाक करायची. कधी ठीकठाक होतं, तर कधी ठीकठाक होत नाही. ठीकठाक झालं तरी आधीसारखं नाही होत. वयोपरत्वे होणारा बिघाड ok. पण आपल्या सवयी, आपल्या आवडी, आपल्या इच्छा इत्यादी इत्यादीमुळे होणाऱ्या बिघाडासाठी आपणच जबाबदार असतो.

समाजशरीराचं आरोग्यही हृदय, फुफ्फुसे, जठर, मूत्रपिंड; इत्यादींवर अवलंबून असतं. आपल्या शरीराप्रमाणे आपल्याला त्याचीही माहिती नसते. असं काही असतं हेच ठाऊक नसतं. मग त्याची निगा, काळजी काय घेणार? आपल्याच आरोग्यासाठी आपल्या सवयी, आपल्या आवडी, आपल्या इच्छा इत्यादी नीट राखणारे थोडेच असतात. समाजाच्या आरोग्याचं काय घेऊन बसता?

- श्रीपाद कोठे

२२ ऑक्टोबर २०२१

एक काल्पनिक संवाद...

- काय रे मतदान केलं की नाही?

- नाही बुवा.

- का रे?

- आवडत नाही अन पटतही नाही.

- मग तुला राहूच द्यायला नको या देशात.

- काहीच हरकत नाही. पण म्हणजे काय कराल?

- तुला काढून देऊ देशातून.

- म्हणजे काय करणार?

- नोटीस देऊ देश सोडण्याची. नाहीच गेलास तर... तर...

- सीमेवर सोडणार? दुसऱ्या देशात सोडणार?

- तर कारागृहात टाकू.

- म्हणजे राहण्या जेवण्याची तब्येतीची सोय करणार. फुकटात. तुमच्या पैशांनी.

- हो तसं म्हण हवं तर.

- बरं ही शिक्षा देईन म्हणतोस पण एक सांगशील का? कोणत्या अधिकाराने देणार ही शिक्षा? म्हणजे कोणी दिलाय हा अधिकार तुम्हाला?

- दिलेला नाही, घेतलाय आम्ही आमचा. मिळवलाय मिळवलाय.

- ओके. कुठून? कसा?

- संघर्ष करून, शक्ती प्राप्त करून. एकीने.

- बरं. पण अधिकार कसला मिळवलाय?

- या देशावर राज्य करण्याचा.

- हा देश कोणाकडून घेतलाय? त्याच्या नोंदणीचे कागद दाखवतोस? मूळ मालकाचं नाव, त्याच्या अटी, शर्ती, सही दाखवतोस जरा...

- श्रीपाद कोठे

२२ ऑक्टोबर २०२२

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

शेवट ली माळ

आज शेवटली माळ. जगभरातील कोट्यवधी अनामिकांसाठी. उर्जस्वल ध्येयासाठी, जगाला प्रकाश देण्यासाठी, आपली चूलबोळकी अडगळीत टाकून जगाचा संसार चालवण्यासाठी जगणाऱ्यांना साथ देणाऱ्या शक्तीस्वरुपांसाठी. समाजकारण किंवा राजकारण, धर्म किंवा विज्ञान, शिक्षण किंवा सेवा, शेती किंवा वैद्यक, कला किंवा साहित्य... सगळ्या क्षेत्रात, सगळ्या जगभरात वावरणाऱ्या वेड्यांना- कधी पत्नी म्हणून, कधी बहीण म्हणून, कधी आई म्हणून, कधी प्रेयसी म्हणून, कधी मैत्रीण म्हणून, कधी कुठलंही नाव न देता येणाऱ्या अनाम भावबंधातून; परंतु ज्यांना साथ देतात त्या वेड्यांच्या उर्जस्वल विचारांवरील, प्रेरणांवरील आस्थेतून; हे वेडे जे करतायत ते आपल्याला जमत नसेल, समजत नसेल, पण ते चांगलं आहे, खूप महत्वाचं आहे या जाणीवेतून प्रसूत झालेल्या समर्पणाच्या भावनेतून साथ देणाऱ्या या अनामिका... हां, नावेच घ्यायची तर लक्ष्मणाची उर्मिला, तुकोबांची जिजाई, सावरकरांच्या यमुनाबाई आणि वहिनी, डॉ. हेडगेवारांच्या वहिनी, गुरुजी गोळवलकर यांच्या मातोश्री, बाळासाहेब देवरस यांच्या आई, पुलंच्या सुनीताबाई, र. धों. कर्वेंच्या पत्नी, साधनाताई आमटे... नावे घेता येतील अशा असंख्य आणि ज्यांची माहितीही नाही अशा अगणित अनामिकांसाठी- आजची माळ.

- श्रीपाद कोठे

२१ ऑक्टोबर २०१५

अरे अर्णवा,

अरे अर्णवा, ऋग्वेद वगैरे quote करताना थोडा विचार करून बोलत जा रे. हिंदूंनी मानवासमोर ठेवलेला आदर्श कायदा वा अन्य प्रकारे लादण्यासाठी नाही, लादणे हे हिंदू धर्माच्या घोरविरोधी आहे. तो आदर्श या पृथ्वीवर येणाऱ्या प्रत्येकाने त्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे, विकासावस्थेनुसार गाठण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. बंधनकारक नाही. त्यासाठीचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. हिंदू तत्व भारतबाह्य रीतीने समजून घेता येत नाहीत.

- श्रीपाद कोठे

२१ ऑक्टोबर २०१८

गांधीजी आणि चित्रपट क्षेत्र

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त काल पंतप्रधानांनी चित्रपट सृष्टीतील कलावंतांशी संवाद साधला. चांगली गोष्ट आहे. तसेही वाईट काही पाहू नये, बोलू नये, ऐकू नये. गांधीजींचीच तीन माकडे सांगतात ना ! अन गांधी बाजूला ठेवले तरी आपल्याला साधू (खरे तर संधीसाधू) व्हायचे असते ना? त्यामुळे पंतप्रधान कलावंतांना भेटले आणि गांधी विषयाची चर्चा झाली, हे चांगलेच झाले. या कलावंतांनी त्यांच्या मनोरंजन माध्यमातून गांधी जीवन, विचार यांना प्रसारित करण्याचे आश्वासन देखील दिले. हेही चांगलेच झाले. गांधीजी हे साधेपणा, अपरिग्रह, शारीरिक कष्ट, स्वभाषा, दारूबंदी यासारख्या विषयांचे प्रचंड आग्रही होते. स्वतःच्या जीवनात हे सारे आणण्याचा प्रयत्न म्हणजेच त्यांचे जीवन. अन त्यांचे जीवन हाच त्यांचा विचार. तर, या कलाकारांनी चित्रपटातून हे पोहोचवण्याचे आश्वासन दिलेले आहे. स्वतःच्या जीवनात गांधी उतरवण्याचे नाही. त्यांना तसे आश्वासन मागितलेही नाही कोणी आणि त्यांनी कोणाला तसे आश्वासन दिलेही नाही. कृपया याची नोंद आपण घेतलेली बरी. नाही म्हणायला, देशभर शिक्षण किंवा आरोग्य किंवा स्वच्छता किंवा अशाच एखाद्या क्षेत्रातील समाजाची संपूर्ण गरज; कोणाचीही कसलीही मदत न घेता/ न मागता; सरकारी जमिनी इत्यादींचीही मागणी न करता; समाजाच्या भल्यासाठी कार्यक्रम आयोजित करून समाजाच्याच खिशाला हात न लावता; पूर्ण करण्याची क्षमता चित्रपट कलावंतांची आहे. पण ते चित्रपट माध्यमाच्या धर्मात बसत नाही ना ! तेव्हा संपर्क चांगला झालेला आहे दोन क्षेत्रातला. चर्चा वगैरेही उच्च दर्जाचीच झालेली आहे. चित्रपट पाहण्याची आणि भारावून जाण्याची तयारी करायला सामान्य जनतेला अवधी मिळालेला आहे. बाकी मतदानाचे कर्तव्य करून देश घडवण्याचे काम आज करायचे आहेच आपल्याला.

- श्रीपाद कोठे

२१ ऑक्टोबर २०१९

भगवंत आणि सरकार

- जगाचं भलंबुरं भगवंत करतो.

- त्याला प्रसन्न करणं आवश्यक असतं.

- त्याची मंदिरं असतात.

- त्याची पूजेची, उपासनेची पद्धत असते.

- जो मंदिरात जाणार नाही, पूजा, उपासना करणार नाही, भजन कीर्तन उत्सवात सहभागी होणार नाही; त्याला भगवंताची मर्जी लाभणार नाही.

- अशांना भगवंत शिक्षा करतो.

- त्या शिक्षेमुळे अशांचे जीवन दु:खी होते.

*****************

- देशाचं/ समाजाचं भलंबुरं सरकार करते.

- त्याला प्रसन्न करणं आवश्यक असतं.

- त्याची मंदिरं असतात.

- त्याची पूजेची, उपासनेची पद्धत असते.

- जो मंदिरात जाणार नाही, पूजा उपासना करणार नाही, भजन कीर्तन उत्सवात सहभागी होणार नाही; त्याला सरकारची (लोक प्रतिनिधींची) मर्जी लाभणार नाही.

- अशांना सरकार शिक्षा करते.

- या शिक्षेमुळे अशांचे जीवन दु:खी होते.

***************

- श्रीपाद कोठे

२१ ऑक्टोबर २०१९

मां दुर्गेचा संहार

दुर्गा उत्सवानिमित्त दरवर्षीच दुर्गा, तिची शस्त्र, तिचा संहार; इत्यादींची चर्चा होते. यात एक नेहमी लक्षात ठेवण्याची गोष्ट ही की, दुर्गेचा हा संहार अधर्माचा संहार असतो. बाकीच्या अन्याय वगैरे ज्या गोष्टी या संहाराशी जोडल्या जातात त्या योग्य वाटत नाहीत. कारण अन्याय इत्यादी सापेक्ष, subjective बाबी असतात. या सगळ्या बाबी धर्म, अधर्म या निकषांवर घासून मग संहार आदी निर्णय करायचा असतो. नाही तर मला अन्याय वाटतो म्हणून कर संहार, मला अत्याचार वाटतो म्हणून कर संहार, मला अयोग्य वाटतं म्हणून कर संहार. असं केलं तर वास्तविक तो अधर्म होईल. ज्याचा संहार हे दुर्गेचं कार्य आहे. अन धर्म, अधर्म हे; हिंदू, शीख, जैन, बुद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादी किंवा मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा, अमुक ग्रंथ, अमुक व्यक्ती, अमुक समूह किंवा अगदी सामाजिक नीतीनियम; यांच्याशी जोडलेली कल्पना नव्हे. धर्म याचा जो सर्वोच्च व्यापक भाव आणि अर्थ आहे त्या अर्थाने धर्म, अधर्म निर्णय करून दुर्गा शस्त्र वापरते, संहार करते. आपापल्या स्वार्थासाठी माँ दुर्गेला वापरू नये.

- श्रीपाद कोठे

२१ ऑक्टोबर २०१८

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

पांगुळगडा

चालणं शिकण्यासाठी पांगुळगाडा हवाच. पण पांगुळगाडा दूर सारल्याशिवाय चालणं आणि धावणं शक्य होत नाही. दोन्ही योग्य. दोन्ही आवश्यक.

चालण्याचे हे नियम - विचार करणं, निर्णय घेणं, काम करणं, सामाजिक कार्य, एखाद्या विषयाचं अध्ययन, मनाचा आनंद, मनाचं रंजन, आध्यात्मिक साधना; या आणि यासारख्या जीवनातल्या बहुतेक गोष्टींना लागू होतात. पुस्तकं, मंदिरं, धर्मग्रंथ, विचारवंत, माणसं, साधनं, कृती; या सगळ्यांकडे याच पद्धतीने पाहावं लागतं. कर्ता, कर्म, क्रियापद टाकून देऊन सोलीव तत्वाचं आकलन करण्याचा प्रयत्न हवा. कोणतीही गोष्ट अनुभूत व्हायला हवी.

- श्रीपाद कोठे

१९ ऑक्टोबर २०२०

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२

Consumption theme योग्य?

`अर्थ' या विषयावर बोलणाऱ्यांचा एक महत्वाचा विषय असतो- `consumption theme.' लोकांनी उपभोग घेतला पाहिजे, त्यासाठी त्यांच्या हाती पैसा असला पाहिजे. त्यामुळे अर्थव्यवस्था गतिमान राहून प्रगती होते. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथे एकूणच समाज उपभोग घेण्यात मुळीच मागे नाही. use and throw हे तर तिथल्या संस्कृतीचं वर्णनच करण्यात येतं. असं असूनही त्यांच्या अर्थव्यवस्थांच्या प्रगतीचा दर १-२ टक्केच राहतो. खूप प्रयत्न सुरु आहेत पण दर वाढत नाही. यावरून `consumption theme' मध्ये फारसा अर्थ नाही असं म्हणायला हरकत नाही.

- श्रीपाद कोठे

१८ ऑक्टोबर २०१९

नेहरूंना प्रश्न करावा

पुन्हा एकदा सावरकर चर्चेत आले आहेत. गांधीहत्येत सहभागी असल्याने त्यांना भारतरत्न देऊ नये असाही एक आवाज आहे. एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, गांधी हत्येसाठी सावरकर वा संघ यांना दोषी ठरवणाऱ्यांचा पंडित नेहरूंवर तरी विश्वास आहे की नाही? बरं त्यांची सत्तागाठ पटेलांशी बांधली होती असं म्हटलं तरी १९५० नंतर ती सुटली आणि नंतर १४ वर्ष नेहरूंना कोणताही अडथळा नव्हता. तरीही गांधी हत्येच्या आरोपातून मुक्त झालेले सावरकर आणि संघ मोकळेच राहिले. ज्यांना सावरकर आणि संघ सलतात त्यांनी त्यासाठी पंडित नेहरूंना प्रश्न केले पाहिजेत.

- श्रीपाद कोठे

१८ ऑक्टोबर २०१९

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

भ्रष्टाचार की असभ्यता

पुढील महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. अमेरिका भ्रष्टाचाराच्या बाजूने आहे की असभ्यता व अश्लीलतेच्या बाजूने हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र अमेरिकेपुढे हे दोनच पर्याय आहेत.

१. सर्वाधिक स्वातंत्र्य

२. नियमपालन करण्यात आघाडीवर

३. देशभक्त

४. संरक्षण, तंत्रज्ञान, पैसा यात आघाडीवर.

... तरीही पर्याय दोनच - भ्रष्टाचार की असभ्यता? आदर्श समाज, आदर्श देश, विकसित सुखी समृद्ध देश घडवताना आपण थोडा याचाही विचार करायला नको?

- श्रीपाद कोठे

१७ ऑक्टोबर २०१६

Good hindu

अयोध्येत श्रीरामाचे मंदिर झालेच पाहिजे. अन मी bad hindu नाही. मी good hindu च आहे. हे दिवटे कोण होतात मला bad ठरवणारे? अन ते म्हणतात म्हणून मी का स्वतःला bad म्हणवून घेऊ. स्वतःला urban naxal म्हणवून घेणारे खरंच तसे असतात. ते खरंच बोलत असतात. मी का खोटं बोलायचं bad hindu आहे असं. अन ते गाढव प्रथा निर्माण करतात ती तरी मी का follow करायची? I am a best hindu and I want shriram mandir at ayodhya earliest.

- श्रीपाद कोठे

१७ ऑक्टोबर २०१८

शैली नव्हे आधार

'Hindutva is a way of life' असं म्हटलं जातं. ते खरं आहे पण अपूर्ण आहे आणि संकुचित/ मर्यादित आहे, असं आता वाटायला लागलं आहे. खरं तर 'Hindutva is a foundation of life' हे यथार्थ होईल. हिंदुत्व केवळ जीवनशैली नाही तर जीवनाधार आहे. पृथ्वीवरच्या समग्र जीवनाचा आधार. या आधारातून शैली विकसित होतात, बदलतात, गतार्थ होतात, सृजित होतात.


- श्रीपाद कोठे

१७ ऑक्टोबर २०२१

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

आज जागतिक अन्न दिवस

अन्न !!! माणसाचीच नव्हे प्रत्येक सजीवाची एकमेव मुलभूत गरज. एकवेळ वस्त्र, निवारा नसले तरी चालेल; पण अन्न हवेच. या विश्वात मानवाचा प्रवेश झाला तेव्हापासून आजवरचा त्याचा अन्नप्रवास अजूनही निबिड इतिहासगुहेतच लपलेला. या निसर्गात असलेल्या असंख्य गोष्टींपैकी खाण्याच्या वस्तू कोणत्या, त्या कशा खायच्या, त्यावर काय काय प्रक्रिया करायच्या, त्यांची combinations, त्यांचे आकार-प्रकार, त्यांची सजावट, त्यांचे उपयोग, स्वास्थ्याशी त्यांचा संबंध आणि प्रत्यक्षात हे सारे करून; आजवर या पृथ्वीवर येऊन गेलेल्या अन वर्तमानातील अब्जावधी जीवांची अन्नकाळजी वाहणारी ही अक्षय, अनाम शक्तीधारा. आज जागतिक अन्नदिवस आहे. अनाम राहून मानवावर अपरिमित उपकार करणाऱ्या या शक्तीप्रवाहाला वंदन करून -

- अन्न मुळीच वाया न घालवण्याचं,

- अन्नाचा अपमान न करण्याचं,

- अन्न आणि अन्नदाता यांच्याबद्दल कृतज्ञ राहण्याचं,

- अन्नाचा गैरवापर न करण्याचं,

- प्रत्येकाला पुरेसं अन्न मिळावं अशी भावना ठेवून त्यासाठी प्रार्थना करण्याचं, त्यासाठी आपल्या आवाक्यातील प्रयत्न करण्याचं,

... वचन स्वतःच स्वतःला देऊ या.

- श्रीपाद कोठे

१६ ऑक्टोबर २०२१

बारबाला आणि रोजगार

सर्वोच्च न्यायालयाबद्दल पूर्ण आदर व्यक्त करतानाच, त्याने काल दिलेल्या डान्सबार बाबतच्या निर्णयावर असहमती व्यक्त केल्याविना राहवत नाही. ७५ हजार बारबालांचे रोजगार हा एकच मुद्दा त्यात आहे. रोजगार ही महत्वाची बाब असली तरीही-

१) डान्सबारमध्ये नाचणे वा मद्य पुरवणे एवढेच रोजगाराचे पर्याय आहेत का?

२) वरील पर्याय फार प्रतिष्ठा देणारा, सन्मानजनक वगैरे आहे का?

३) अन्य उद्योग बंद पडतात तेव्हा देखील हजारो लोक बेरोजगार होतात. ते वेगवेगळे पर्याय शोधतातच ना? बारबालांनी ते का करू नये?

४) या मुली वेगवेगळ्या ठिकाणांहून मुंबईत आलेल्या असतात. त्यांच्या त्यांच्या जिल्हा ठिकाणी त्यांनी काम का करू नये?

५) ७५ हजार मुलींचा workforce शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, सेवा, सुरक्षा अशा अनेक बाबींसाठी उपयोगात येऊ शकतो. त्याऐवजी बारमध्येच काम करण्याचा या मुलींचा हट्ट का?

६) `आम्ही मुंबईत राहतो' हा बावळट आनंदाचा भाग, फार कौशल्य वा कष्ट न करता उन्मुक्त जीवन जगण्याची मानसिकता, जगण्यासाठी पैशाऐवजी पैशाची राक्षसी ओढ; या तीनच गोष्टींचा अडथळा आहे.

७) न्यायव्यवस्थेने वा सरकारने या तीन अडथळ्यांचा विचार करण्याची काय गरज?

८) न्यायालये कायद्याच्या चौकटीत काम करतात हे अगदी खरे. पण समाजाला युगप्रवर्तक निर्णयांची, त्याच्या आचारविचारात मुळापासून बदल घडवणाऱ्या निर्णयांची व कृतींचीही अधूनमधून गरज असते. कायद्याच्या पलीकडे गेल्याविना ते शक्य नसते. सर्वोच्च अधिकार असलेले पीठच जर कायद्यात अडकून पडत असेल तर युगप्रवर्तक चिंतन कोण करेल?

समाजातील सगळ्या सुबुद्धांना यावर विचार करावा लागेल.

- श्रीपाद कोठे

१६ ऑक्टोबर २०१५

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

भगिनी निवेदिता यांच्या पुस्तकांची यादी

आज वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने भगिनी निवेदितांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी.

1) Kali the Mother,

2) The Web of Indian Life,

3) Cradle Tales of Hinduism,

4) An Indian Study of Love and Death,

5) The Master as I Saw Him,

6) Notes of some wanderings with the Swami Vivekananda,

7) Select essays of Sister Nivedita,

8) Studies from an Eastern Home,

9) Myths of the Hindus & Buddhists,

10) Footfalls of Indian History,

11) Religion and dharma.

- श्रीपाद कोठे

१५ ऑक्टोबर २०१५

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

शक्तीरूपेण संस्थिता (८)

सृजनात्मक, स्थितिस्थापक आणि संहारात्मक अशी ही त्रिविधा शक्ती ज्यातून आविर्भूत होते ती आत्मशक्ती. आत्मशक्ती म्हणजे माझी अर्जित शक्ती नाही. आत्मशक्ती म्हणजे माझ्या 'स्व'रूपाची शक्ती. या आत्मशक्तीची जाणीव, बोध, व्याप्ती, स्वरूप जेवढं आकलन होतं; तेवढ्या प्रमाणात सृजनात्मक, स्थितिस्थापक आणि संहारात्मक शक्तीकडे पाहण्याची; या तीन शक्तींच्या उपयोगाची; आमची भावना आणि क्षमता अधिक अर्थपूर्ण होते.

त्या आत्मशक्तीच्या प्रत्ययाने कृतींना आणि विचारांना लेबल लावणे थांबते, कृतींना आणि विचारांना price tag लावणे थांबते, कृतींना आणि विचारांना वेगवेगळ्या कप्प्यात बंद करणे थांबते. या आत्मशक्तीच्या प्रत्ययाने एकांगीपण कमी होते. या आत्मशक्तीच्या प्रत्ययाने स्वतःकडे तटस्थपणे पाहता येते. या आत्मशक्तीच्या प्रत्ययाने जाळ्यात अडकणे किंवा फसगत होणे कमी होते. या आत्मशक्तीच्या प्रत्ययाने एखादी गोष्ट अमुक ठिकाणी वा वेळी योग्य का आणि दुसऱ्या ठिकाणी वा वेळी तीच गोष्ट अयोग्य का हे कळू लागते. जसे सहानुभूती. मी बाकीच्यांबद्दल सहानुभूती बाळगणे हेच योग्य असते, पण सहानुभूतीची अपेक्षा बाळगणे सर्वस्वी चूकच. हे फक्त एक उदाहरण. सगळ्याच गोष्टींचे असे अनेक कोन, आत्मशक्तीच्या प्रत्ययानंतर लक्षात येऊ लागतात.

म्हणूनच शक्तीचे संपादन, शक्तीची आराधना, शक्तीची उपासना; आत्मशक्तीच्या भक्कम आधाराशिवाय अपूर्ण  आणि अहितकर राहतात. या जगात सुखी आणि समाधानी राहायचे असेल, या विश्वात पूर्णता प्राप्त करायची असेल, या विश्वाला नंदनवन बनवायचे असेल, या विश्वाचा सुमेळ बसवायचा असेल; तर शक्तीची आराधना करावीच लागते. शक्तीची ही आराधना हितकर व्हावी यासाठी आत्मशक्तीचा ध्यास घ्यावा लागेल. त्यासाठी हवे आपल्या मर्यादित अस्तित्वाचे सीमोल्लंघन. शक्तीपूजेच्या नऊ दिवसांनंतर उद्या येणारे सीमोल्लंघन सकलांना आपल्या मर्यादित अस्तित्वाची सीमा लांघून अमर्याद आत्मशक्तीच्या वाटेकडे घेऊन जाणारे ठरो.

- श्रीपाद कोठे

१४ ऑक्टोबर २०२१

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२

महिला समस्या

तीन चार वर्षांपूर्वीचा प्रसंग. एक महिला कार्यकर्त्या (स्वत: महिला आणि महिलांसाठी काम करणाऱ्या) एका प्रकरणाबद्दल सांगत होत्या. त्यांचं कथन झाल्यावर मी त्यांना विचारलं - नेमका प्रॉब्लेम काय आहे? त्या घोटाळ्यात पडल्या. तेव्हा खुलासा करीत मी पुन्हा विचारलं- १) दोघात बेबनाव झाला आहे का? २) दोघांच्या wavelength जुळत नाहीत का? ३) अपेक्षापूर्ती न होण्याचा मामला आहे का? ४) तिसऱ्या कोणाची लुडबुड आहे का? ५) दुष्टपणा आहे का? यावर त्या नाराज झाल्या. म्हणाल्या- हा काय प्रश्न आहे? अन्याय म्हणजे अन्याय. न्याय मिळायलाच हवा. त्यावर मी म्हटले- दोघेही माणसे आहेत ना? त्या रागारागाने उठून निघून गेल्या.

आजच्या वातावरणात आणि चर्चेच्या महापुरात सहज स्मरण झालं.

- श्रीपाद कोठे

१३ ऑक्टोबर २०१८

शक्तीरूपेण संस्थिता (७)

हे विश्व शक्तीने ओतप्रोत आहे एवढंच नाही तर हे संपूर्ण विश्व हीच एक शक्ती आहे. विज्ञान सुद्धा एक प्रकारे हेच प्रतिपादन करतं. हे विश्व कशाचं बनलं आहे? हे विश्व ऊर्जा आहे की वस्तू? की सामान्य वस्तू (common matter), dark matter and dark energy? की एका महास्फोटातून हे विश्व जन्माला आलं? या सगळ्यांबद्दल असंख्य सिद्धांत आणि मतप्रवाह असले तरीही एक गोष्ट मात्र निश्चित की, या विश्वाचं आदिकारण हे शक्ती आहे आणि ती शक्ती अज्ञात आहे. महास्फोट झाला असेल तर कशाचा आणि कसा? Dark energy असेल तर तिचं स्वरूप काय? काहीही सांगता येत नाही. एवढंच सांगता येतं की या विश्वाच्या मुळाशी विलक्षण शक्ती आहे. हे सत्य व्यवहाराला लागू केलं की त्याची तर्कशुद्ध परिणती होते की, ती शक्ती आपण निर्माण केलेली नाही हे तर खरंच पण आपल्याला तिच्याबद्दल काही माहितीही नाही. म्हणजेच ती आपल्या मालकीची नाही. ती शक्ती आपली मालमत्ता नाही. अन हेच सत्य असेल आणि ते प्रामाणिकपणे मान्य करायचे असेल, स्वीकारायचे असेल तर आपल्या मनातली मालकीची भावना, स्वामित्वाची भावना पूर्ण टाकून द्यावी लागते. जी गोष्टच आमची नाही तिच्यावर हक्क कसा सांगता येऊ शकेल? तिची वाटणी कशी करता येऊ शकेल? तिच्यासाठी भांडणे, वाद आणि संघर्ष कसा करता येऊ शकेल? ईशावास्य उपनिषद या शक्तीला ईश्वरी शक्ती म्हणतं, तर विज्ञान dark matter and dark energy. वेगळे शब्द यापलीकडे त्याला वेगळा अर्थ नाही. या आदिशक्तीची विश्वातील गोळाबेरीज तेवढीच असते. ती कमी होत नाही वा वाढत नाही. कमी करता येत नाही आणि वाढवता येत नाही. म्हणजेच प्रत्ययाला येणारं जग म्हणजे फक्त रूपांतरण असतं. त्यामुळेच आपला पुरुषार्थ, आपला वस्तू संग्रह, आपली possessions यांना फारसा अर्थ उरत नाही आणि त्यासाठीची धावपळ अर्थहीन ठरते. भारतीय आध्यात्मधारा तर विज्ञानाच्या पुढे जाऊन म्हणते - matter and energy या दोन वस्तू नाहीतच. ते फक्त एकाच तत्वाचं रूपांतरण आहे. दृश्य आणि अदृश्य याही दोन गोष्टी नाहीतच. त्याही एकाच तत्त्वाचे रूपांतरण असते. त्या आदिशक्तीची गोळाबेरीज म्हणजे हे विश्व. जे कधी दृश्य असतं तर कधी अदृश्य, कधी energy असतं तर कधी matter.

- श्रीपाद कोठे

१३ ऑक्टोबर २०२१

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०२२

गंगाजल

आज सहज पाहिलं तर, विश्व हिंदू परिषदेने १९८० च्या दशकात काढलेल्या गंगाकलश यात्रेच्या वेळी घेतलेल्या गंगाजलाच्या बाटलीतील गंगाजल आजही स्वच्छ आहे. याचाच अर्थ किमान तोवर गंगा शुद्ध होती. तिच्या पाण्याची जादू कायम होती. सगळी घाण त्यानंतरची आहे.

जागतिकीकरणाचा परिणाम??

what next??

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

स्वामी सानंद गंगार्पित झाले. दु:ख स्वाभाविक आहे. पुढे-

- पाण्याची बाटली विकत घेणे बंद. घरून पाणी सोबत नेणे.

- कचरा कमी होण्यासाठी उपभोग आवश्यकतेच्या सीमेत आणणे.

- कचरा कमी होण्यासाठी आवरणाचा मोह सोडणे.

- सांडपाणी मातीत मुरेल याची काळजी घेणे.

- अधिकाधिक माती/ जमीन मोकळी राहील याचा प्रयत्न करणे.

- विजेचा गैरवापर थांबवणे.

- वस्तूंकडील धाव कमी करणे.

- मातीवर प्रेम करायला शिकणे.

- पंच महाभूतांवर वर्चस्व गाजवण्याचा हट्ट टाकून देऊन त्यांच्यावर प्रेम करायला शिकणे.

- `अं, काय होते? मी करून काय होईल?' याऐवजी विचार आणि कृती करण्याचा प्रयत्न करणे.

- माझी क्षमता, माझी परिस्थिती फुटभर माती मोकळी ठेवू शकत असेल तर तेवढी हिमतीने मोकळी ठेवणे.

- योग्य गोष्ट करताना निर्लज्ज होणे.

- प्रदूषण करणारे जे जे आहे ते कमी करणे आणि टाकून देणे. (धूम्रपान, प्रसाधने आदी)

असं काही केलं तर दु:खाला अर्थ राहील.

@@@@@@@@@@@@@@@@

- श्रीपाद कोठे

१२ ऑक्टोबर २०१८

शक्तीरूपेण संस्थिता (६)

सर्वमंगला शक्तीसाठी सद्भाव आवश्यक असतो. परंतु सद्भावांची कठोर परीक्षा पाहणारे क्षण अनेकदा आणि वारंवार येत असतात. कधी स्वतःच स्वतःची परीक्षा घेण्याचा प्रसंग येतो. अशा वेळी परीक्षा टाळण्याची प्रवृत्ती मोठी असते. पुष्कळदा अशा परीक्षेची कारणमीमांसा करण्याची वृत्ती असते. अनेकदा स्वच्छपणे परीक्षेला सामोरे जाऊनही, समजून उमजून परीक्षा अनुत्तीर्ण व्हावे लागते. जगाची आणि जीवनाची रीत लक्षात घेऊन हे सगळे समजूनही घेता येते. समजून घ्यावे लागते. त्यात वावगेही काही नसते.

याव्यतिरिक्त परिस्थितीदेखील सद्भावांची परीक्षा घेण्यात आघाडीवर असते. स्वतःला स्वतःची परीक्षा घ्यावी आणि द्यावी लागते तेव्हा काही गोष्टी आपल्या हाती असतात. त्यामुळे ती परीक्षा, आपण प्रामाणिक असू तर, तुलनेने सोपी असते. परिस्थिती जेव्हा सद्भावांची परीक्षा घेते तेव्हा मात्र आपल्या हाती फार काही नसते. त्यामुळे ती परीक्षा कठीण असते. अशा वेळी सद्भाव कायम ठेवून सर्वमंगला शक्तीचा आविष्कार ही एक साधनाच असते.

महाभारत युद्ध आणि भगवद्गीता हे या बाबतीत कालजयी उदाहरण आहे. युद्धातून पळ न काढणे, संघर्षाला पाठ न दाखवणे; हा गीतेचा संदेश आहे हे तर खरेच; पण तो संदेश नीट समजून घ्यायला हवा. एक लक्षात घ्यायला हवे की, पांडवांवरील अन्यायामुळे महाभारत युद्ध घडले. परंतु गीतेत श्रीकृष्णाने कुठेही त्याचा उल्लेखही केलेला नाही. अर्जुनाला युद्धप्रवृत्त करताना श्रीकृष्णाने कुठेही कौरव पांडव यांच्यातील वाद आणलेला नाही. गीतेत आत्मबोध सांगितला आहे, विश्वरूप दर्शन घडवले आहे. आणि या आत्मदर्शनाने झालेल्या उपरतीनंतर अर्जुन युद्धाला उभा झाला आहे. कोणत्याही युद्धाआधी हे आत्मदर्शन आवश्यक आहे. त्याशिवाय जो संघर्ष होईल त्यात अहंकार, स्वार्थ आणि विकार मिसळलेले राहतील. असा संघर्ष भूषणावह नाही. कारण तो लोण्याच्या गोळ्यासाठी दोन बोक्यांचा संघर्ष असेल. म्हणूनच कोणत्याही संघर्षाआधी संभ्रम निर्माण व्हायलाच हवा. अन त्या संभ्रमातून आत्मबोध हवा. नाही तर आले मनात अन केला संघर्ष असा प्रकार कधीच योग्य नसतो. गीतेचाही तो सांगावा नाही. संघर्ष हा सहनशीलता कमी पडली म्हणून नसावा, तो सत्य रक्षणासाठी असावा. अन आत्मबोधाशिवाय सत्यदर्शन शक्य नाही. संघर्षापासून दूर पळणे योग्य नसते पण हरघडी संघर्षसिद्ध असणेही योग्य नसतेच. संघर्षातील शक्तीचा आविष्कार सर्वमंगल होण्यासाठी संघर्षाआधी आत्मबोध आवश्यक ठरतो.

गीतेचा आणखीन एक संदेश आहे. 'यतो धर्मस्ततो जय:'. जिथे धर्म असेल तिथे जय असतो. पांडवांकडे धर्म (धर्मराज) होता म्हणून श्रीकृष्ण त्यांच्या बाजूने होते. धर्माची संघर्षक्षमता विशेष नव्हती. युद्धाच्या दृष्टीने तो कमकुवत होता. युद्धाची वेळ देखील धर्मामुळेच आली होती. तरीही पांडवांच्या मनात धर्माबद्दल अनास्था, अनादर नव्हता. त्यांनी धर्म सोडला नव्हता. त्यामुळेच संख्या आणि साधनांमध्ये कमी असूनही पांडवांचा पक्ष जिंकला. धर्म म्हणजेच संतुलन शक्ती. ही संतुलन शक्ती असेल तर आणि तरच ईश्वर साथ देतो आणि शक्तीचा सर्वमंगल आविष्कार होतो.

 - श्रीपाद कोठे

१२ ऑक्टोबर २०२१

सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२

शक्तीरूपेण संस्थिता (५)

शक्तीच्या सर्वमंगल आविष्कारासाठी संतुलनशक्तीची सर्वाधिक गरज असते. या संतुलनशक्तीसाठी संयम, समजुतदारी, सात्विकता, सद्भाव अशा अनेक गुणांची गरज असते. पण या गुणांच्या संदर्भात दोन अडचणी असतात. एक म्हणजे, केवळ इच्छा केल्याने वा सांगितल्याने, बोलल्याने हे गुण निर्माण होत नाहीत. अन दुसरी अडचण म्हणजे, या गुणांची कठोर परीक्षा पाहणारी परिस्थितीही वेळोवेळी उत्पन्न होत असते.

यातील पहिली अडचण जी ही गुणसंपदा निर्माण होण्याची; त्यासाठी सातत्याने खूप प्रयत्न करावे लागतात. संस्कार, घरापासून समाजापर्यंत सर्वत्र विशिष्ट वातावरण, स्पृहणीय गुणांना अनुसरून अधिकाधिक व्यवहार करणारी भरपूर माणसे, या गुणांबद्दल सार्वत्रिक आस्था आणि आदर, या गुणांच्या बळाचं आणि मर्यादांचं भान असणारे सर्व क्षेत्रातील नेतृत्व, ही गुणसंपदा वृद्धिंगत व्हावी आणि जोपासली जावी याचा प्रयत्न करणारा बुद्धिजीवी वर्ग; अशा अनेक गोष्टी असाव्या लागतात. त्याही सतत. आज आहेत आणि उद्या नाहीत असे चालत नाही. हे सगळे असावे यासाठी किंमत चुकवावी लागते. ही किंमत आर्थिक असते, नावलौकिकाची असते, पदप्रतिष्ठेची असते, लोकमान्यतेची असते, जीवनाची असते, सन्मानाची असते, सहकार्याची असते, सोबतीची असते. आणखीनही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. ही किंमत चुकवल्याशिवाय गुणसंपदेची निर्मिती शक्य नसते. अशी गुणसंपदा भरपूर प्रमाणात निर्माण होते तेव्हाच लोकांची आंतरिक शक्ती वाढते. अन ही आंतरिक शक्ती आणि परिपक्वता वाढली की त्यातूनच संतुलनशक्ती विकसित होते. आदेश देऊन, कायदे करून, जबरदस्तीने, बलपूर्वक संतुलनशक्ती निर्माण करता येत नाही.

यासोबतच या गुणांची कठोर परीक्षा पाहणाऱ्या, दुसऱ्या अडचणीचाही विचार करावाच लागतो.

- श्रीपाद कोठे

११ ऑक्टोबर २०२१

रॉकेलची गाडी

कुठल्या तरी वाहिनीवर कुठला तरी चित्रपट गळत होता. वाहिन्या बदलता बदलता एकदम थांबलो. पडद्यावर रॉकेलची गाडी दिसली. मन एकदम चाळीसेक वर्षे मागे गेलं. कदाचित त्याहूनही थोडं जास्तच. वडिलांनी घर बांधल्यानंतर दोन तीन वर्षे घरी वीज नव्हती. कंदील, चिमणी, स्टॅण्ड हे अंधारानंतरचे सोबती. रोज संध्याकाळी रांगोळीने काचा पुसणे आणि त्यात रॉकेल भरणे हे काम असे. शिवाय स्वयंपाकासाठी असलेल्या स्टोव्हमध्येही रॉकेल लागतच असे. आठवड्यातून एकदोनदा रॉकेलची गाडी येत असे. एक बैल जुंपलेली ती गाडी. बैलामागे बसलेला विक्रेता मालक. त्याच्या मागे उतरता मोठा लोखंडी पिंप. रॉकेल भरलेला. त्या पिंपाला खालच्या म्हणजेच गाडीच्या मागच्या बाजूला अडकवलेली; अर्धा लिटर, एक लिटरची मापे. अन दुरून येणारा विक्रेत्याचा ते लोखंडी पिंप वाजवण्याचा आवाज. तो विशिष्ट आवाज आला की समजायचे रॉकेलची गाडी आली. घरच्या टिनाच्या डब्यातील रॉकेल तळाशी गेले असेल तर मायबाई सांगे, रॉकेलवाल्याला थांबव बरं. मग कोणीतरी बाहेर जाऊन वाट पाही आणि तो घरापुढे आला की थांबवत असे. मग जेवढे हवे असेल तेवढे रॉकेल तो त्याच्या मापाने मोजून आपल्या डब्यात देत असे. रॉकेलवाल्याने त्याचे माप पिंपाच्या खालच्या नळाच्या तोटीला लावले की सगळे लक्ष त्याकडे. त्याने कंची मारू नये म्हणून. पण रॉकेलवालाही चांगला होता. माप भरलं की नळ बंद करी. मग क्षणभर थांबे. मापाच्या तोंडाशी जमलेला फेस निवळायचा. मग पुन्हा किंचित नळ सोडायचा आणि ते माप आपल्या डब्यात रीतं व्हायचं. मग पैशाची देवाणघेवाण. हळूहळू वीज, गॅस आले. रॉकेलचा वापर कमी झाला, पण संपला नाही. एक तर वीज गेल्यावर पर्याय तयार असो म्हणून रॉकेल राहत असे. शिवाय आजी सोवळ्याचा स्वतःचा वेगळा स्वयंपाक करायची स्टोव्हवर. त्यालाही लागत असे. त्यामुळे अधूनमधून रॉकेलची खरेदी होई. काही वर्षांनी अशा प्रकारे रॉकेल विकणेच बंद झाले. रॉकेल रेशनच्या दुकानातून मिळायला लागले. गाडीवाला रेशनच्या दुकानाबाहेर उभा राहायचा. हळूहळू तेही बंद झाले. वापर आधीच बंद झाला होता. नंतर विक्री आणि गाडीही बंद झाली. रॉकेलसाठी मातीचे तेल किंवा घासलेट हेही शब्द वापरात होते. धोतर कुडता घालणारा, खांद्यावर शबनमसारखी पैशाची पिशवी आडवी लावणारा, थांबल्यावर टुणकन उडी मारून गाडीवरून उतरणारा, ठेंगणासा रॉकेल गाडीवाला अजूनही आठवतो. रॉकेल विकणारी व्यक्ती तशीच असायला हवी असं मन म्हणतं. त्यामुळे छोट्या पडद्यावर रॉकेलची गाडी पाहून जुने दिवस आठवले तरी, रॉकेलवाला म्हणून बच्चन काही जमला नाही बॉ.

- श्रीपाद कोठे

रविवार, ११ ऑक्टोबर २०२०

भस्म्या

चीनमध्ये १ ते ६ ऑक्टोबर साजऱ्या होणाऱ्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ५० पदरी महामार्गावर २० किमी लांबीचा जाम लागला. सगळी वाहतूक ठप्प झाली होती. ५० पदरांचा हा मार्ग त्यावेळी काही तांत्रिक कारणांनी २० मार्गांचा करण्यात आला होता. म्हणजे वाहतुकीसाठी ५० पैकी २० मार्गच उपलब्ध होते. त्यामुळे ही अडचण निर्माण झाली, असे त्याचे स्पष्टीकरण आहे.

एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग झाला की त्याला जाणीवा राहत नाहीत म्हणतात. लागलं, खुपलं, रक्त आलं, चिरलं, खरचटलं, मारलं... काहीही नाही. आजच्या मानवाला जणू असाच कुष्ठरोग झाला आहे का? त्याला काही जाणवतच नाही. उलट, `अडचणींवर मात करणे म्हणजे पुरुषार्थ' या तत्वाचं महाविडंबन करण्याचा सपाटा जणू मानवाने लावला आहे. स्वत:च्या मनाचं अन बुद्धीचं इतकं स्तोम मानवाने सध्या माजवलं आहे की त्याला तोड नाही. यातूनच `मन:पूतं समाचरेत' (मन म्हणेल तसं करत सुटायचं) सुरु झालं आहे.

अतिशय निरर्थक गोष्टी करायच्या, त्यांची गौरवगीतं गायची, नवे घोळ- नवे गोंधळ निर्माण करायचे, कशाचीही काहीही पर्वा करायची नाही, जीवन आपल्याला जेवढं निरर्थक वाटतं तेवढंच इतरांनाही वाटायला हवं असा आग्रह धरायचा, तसं न वाटणाऱ्यांना हिणवत राहायचं, जीवनातील गांभीर्य- सकसता- सार्थकता- खोली- व्यापकता- यांचं अवमूल्यन करायचं, अन कोणत्यातरी अज्ञात उन्मादात चित्कारत राहायचं; हीच आधुनिकता, हीच जीवनशैली, हेच जगणं.

त्यामुळे एक पदरीचे अनेक पदरी रस्ते झाले, रस्त्यांवर उड्डाणपूल आले, उड्डाणपुलांचे मजले वाढले; आम्हाला झालेला भस्म्या रोग संपायला मात्र तयार नाही. एखाद्याला झालेला भस्म्या रोग त्याच्या मृत्यूनेच संपतो म्हणतात, माणसाला जडलेला हा भस्म्या रोग मानवजातीच्या अंताशिवाय संपणार नाही, कदाचित.

- श्रीपाद कोठे

११ ऑक्टोबर २०१५

रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

हिंदुत्व म्हणजे व्यापक होत जाणे

हिंदुत्व म्हणजे आहे तिथून व्यापक होत जाणे. म्हणूनच-

- दिवाळीला फटाके फोडणे थांबवणे.

- लग्नाच्या वराती, निवडणूक मिरवणुका यातील फटाके थांबवणे.

- नाताळ वा नववर्ष स्वागताला फटाके न फोडणे.

- जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा धार्मिक रीतीरिवाज म्हणून पशुहत्या न करणे.

- गाड्यांचा वापर कमी करणे.

- गाण्यांचे आवाज कमी करणे.

- वापराच्या प्रमाणात अधिक झाडे लावणे.

- महिलांना त्यांचा अवकाश मिळू देणे.

- बालकांना बालपण मिळू देणे.

- भौतिक उन्नतीसोबतच मानसिक, बौद्धिक, आत्मिक विकासाचा प्रयत्न करणे.

- माझ्या मार्गाने येणारेच स्वर्गाचे अधिकारी, हा आग्रह सोडणे.

- जिहाद चा त्याग करणे.

- सगळेच उपासना मार्ग सत्य आणि योग्य आहेत याला मान्यता देणे.

- कोणी संकुचितपणा करतात म्हणून आपण संकुचितपणा न करणे.

- संकुचितपणा करणाऱ्यांना स्पष्टपणे तसे सांगण्याचा संकोच न करणे किंवा त्यांना तसे सांगताना भय न बाळगणे.

- व्यापकतेच्या नावाने एकांगीपणा करून ढोंगबाजी न करणे.

- अशा ढोंगी लोकांना परखडपणे ते जाणवून देणे.

हे सगळंच हिंदुत्व. संकुचित होणे कोणाच्याच हिताचे नाही. व्यापक होणे सगळ्यांच्याच हिताचे. त्यामुळे सगळ्या जगाने हिंदुत्व स्वीकारायला हवे.

- श्रीपाद कोठे

१० ऑक्टोबर २०१७

जोगवा

नेहमीप्रमाणे आजही, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ती आली. तिचे नाव गाव माहिती नाही. पण चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र अशा दोन्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ती येते. जोगवा मागायला. बरीच वर्षे झाली. नेम चुकलेला नाही. आई येथे असताना त्या दोघींच्या गप्पाही होत. आई येथे नसल्याला तीन वर्षे झाली. तरीही ती येते. कारण ती जोगवा मागायला आल्यानंतर तिला शिधा, दक्षिणा देण्याचे मी सुरूच ठेवले आहे. आजही ती येऊन गेली. शिधा, दक्षिणा घेऊन गेली. हा काही तिचा व्यवसाय नाही. अन दोन नवरात्रीत जोगवा मागून वर्षभर उदरनिर्वाह चालतही नाही. हे तिचे व्रत आहे आणि ती ते निष्ठेने करते आहे. भारतीय समाजजीवनाचा एक चिवट धागा मला यात दिसतो. दान मागणे आणि दान देणे या दोन्हीत चुकीचे आणि ओशाळवाणे काही नाही. भारतात तसे कधी समजले गेले नाही. आज तसे समजले जाते याचे कारण आपण भारतीय ethos चा त्याग केलेला आहे. भारतीय संदर्भात `भिक्षा' ही खूप वेगळी कल्पना आहे. प्रत्येक गोष्टीचे महत्व, मूल्य, किंमत, उपलब्धता सारखी असू शकत नाही; प्रत्येक व्यक्तीची क्षमता, कल आणि गुण समान असू शकत नाही; तरीही प्रत्येकाला चांगले जगण्याचा हक्क आहे आणि प्रत्येकाच्या वेगळेपणाची समाजाला व सृष्टीला गरज आहे; या सगळ्याचा मेळ घालणे; आणि या प्रयत्नातून मानवी जीवन अंतरंगसमृद्ध करणे; याचं जे एक web designing भारताने केलेलं आहे ते लक्षणीय आहे. त्यामुळेच बारकाईने पाहिलं तर `दान' हा व्यक्तीजीवनाचा, समाजजीवनाचा, विश्वजीवनाचा, धार्मिक जीवनाचा, आध्यात्मिक जीवनाचा पाया आणि आधार आहे. वर्तमान आर्थिक, सामाजिक समस्यांच्या दाहक वास्तवाचा विचार करताना वास्तविक भारताच्या या पैलूचा अधिक आणि सर्वंकष विचार व्हायला हवा, समोर मांडला जायला हवा. मात्र, कालमहिमा असा आहे की आमच्यावर भारतेतर विचार, भावभावना वरचढ आहेत आणि `मी' हा कमालीचा मोठा झाला आहे. अर्थात काळ कूस पालटत असतो, हेही खरे.

- श्रीपाद कोठे

१० ऑक्टोबर २०१८

भारतीय व्यक्तिवाद

भारतीय चिंतन हे मूलतः व्यक्तिवादी चिंतन आहे. व्यक्तिवाद भारताला नवीन नाही. किंबहुना भारतीय विचार प्रचलित व्यक्तिवादाहून अधिक व्यक्तिवादी आहे. परंतु या दोन व्यक्तिवादात दोन फरक आहेत.

१) प्रचलित व्यक्तिवादाप्रमाणे भौतिकता, ऐहिकता, जडवाद, भोगवाद, वर्चस्ववाद हे भारतीय व्यक्तिवादाचे आधार नाहीत.

२) भारतीय व्यक्तिवादाने त्याची जबाबदारी व्यक्तीवर टाकलेली आहे. प्रचलित व्यक्तिवादाप्रमाणे समाजावर नाही. आम्हाला आमच्या मताप्रमाणे जगता आले पाहिजे हे दोघांनाही मान्य असले तरीही; त्यातील यश, अपयश, त्रास, संघर्ष, मान्यता, अमान्यता, कौतुक, हेटाळणी यांची जबाबदारी समाजाची; असे प्रचलित व्यक्तिवाद म्हणतो. आम्हाला काय वाटावे किंवा आम्ही काय करावे यात समाजाला say असता कामा नये, पण परिणामांची जबाबदारी आणि आपल्या मतानुसार वागण्यासाठी अनुकूल स्थिती देण्याची जबाबदारी मात्र समाजाची; हा प्रचलित व्यक्तिवादी विचार आहे. तो समाजाला व्यक्तीचा नोकर अशा स्वरूपात पाहतो. तो समाजाला गृहित धरतो. याउलट भारतीय व्यक्तिवाद पूर्ण स्वातंत्र्यासोबत पूर्ण जबाबदारी घ्यायला सांगतो आणि समाज आणि व्यक्तीचे संबंध mutual आहेत असे मानतो.

- श्रीपाद कोठे

१० ऑक्टोबर २०१८

महापुरुष ही प्रेरणा

एका पोस्टवर दिलेली प्रतिक्रिया-

मुळात महापुरुष ही फक्त एक प्रेरणा असते. त्याऐवजी त्यांना icon समजणे हे फसवं असतं. अनंतवार हा प्रश्न त्यामुळेच उत्पन्न होतो. महापुरुषांचं अनुकरण, त्यांचे विचार आचरणात आणणं, त्यांच्या मार्गावर चालणं, त्यांचे सल्ले मानणं; असं काहीच नसतं. मुख्य म्हणजे असू शकत नाही. का असू शकत नाही हा स्वतंत्र विषय आहे. सामान्य माणसाच्या मनात महान होण्याची ठिणगी पेटवणं एवढंच फक्त त्यांच्या जीवनाचं प्रयोजन असतं. ही ठिणगी पेटून तिचा वणवा होणं ही पुन्हा वेगळी बाब. अशा ज्या ठिणग्या पेटल्या त्यांचाच परिणाम म्हणजे आजची मानवी सभ्यता. हीच प्रक्रिया सुरू राहील आणि त्यालाच आपण परिवर्तन म्हणतो. परिवर्तन हा उद्देश नसतो अन ते घडवताही येत नाही. परिवर्तन हा प्रेरणेचा परिणाम तेवढा असतो.

- श्रीपाद कोठे

१० ऑक्टोबर २०१९

दत्तोपंत उवाच

थोर चिंतक स्व. दत्तोपंत ठेंगडी यांचे जन्मशताब्दी वर्ष येत्या लक्ष्मी पूजनाला संपेल. गेल्या वर्षी उदघाटन कार्यक्रम झाला होता. यावर्षी समारोप होणे कठीण आहे. नुकताच एक ऑनलाइन समारोप कार्यक्रम पाहिला. आयोजकांच्या सोयीने तो घेतला असावा. या निमित्ताने स्व. ठेंगडी यांच्या एका प्रसिद्ध भाषणातील काही वेचे. एवढेच वेचे वारंवार वाचले तरीही विचारांना दिशा आणि आकार मिळू शकेल. वर्तमानातील अनेक गोष्टींचा विचार करतानाही यातून प्रकाश मिळू शकेल. ज्यांना विविध कारणांनी ठेंगडीजीच मान्य नाहीत किंवा जे thengdi school of thought इत्यादी पद्धतीने विचार करतात त्यांनाही निश्चितच काही ना काही मिळेल.

`विद्यमान दुस्थिति को बदलने के लिए एक ऐसी जीवनरचना की आवश्यकता है जिसके जीवनमूल्य अलग ढंग के हो. इसमें भौतिक और अभौतिक जीवनमूल्यों की एक सार्वलौकिक व्यवस्था की जाय. (पूर्णतया आध्यात्मिक पद्धति शब्द का प्रयोग नहीं कर रहा हूँ.) इसमें जैसे एक प्रेरणा भौतिक लाभ की है, वैसी ही दूसरी प्रेरणा सामाजिक प्रतिष्ठा की है. और फिर इन दोनों को संयुक्त कर एक समन्वयात्मक पद्धति का निर्माण आवश्यक है. ऐसी स्थिति का निर्माण अतीत में भारत में किया भी गया था. इसके अंतर्गत सामाजिक प्रतिष्ठा और व्यक्तिगत उपभोग की व्युत्क्रमानुपाती (inverse ratio) व्यवस्था स्थापित कर कहा गया था कि अगर अधिक से अधिक सामाजिक प्रतिष्ठा चाहिए तो कम से कम भौतिक लाभ उठाना होगा. अधिक से अधिक भौतिक लाभ उठाना चाहते हो तो लाभ उठा सकते हो, पर सामाजिक प्रतिष्ठा नही रहेगी. इस समन्वयात्मक और संतुलित रचना द्वारा दोनों प्रेरणाओं को बनाये रखा गया.’ (श्री. दत्तोपंत ठेंगडी - एकात्म मानववाद : एक अध्ययन, फेब्रुवारी १९७०, कानपूर)

`पश्चिम मे व्यक्ती और समाज के बीच बडा संघर्ष है. वहां यह समस्या है कि व्यक्ती और समाज का दायरा, उनकी मर्यादा क्या हो? यदि व्यक्ती का दायरा बडा होगा तो समाज की मर्यादा उसी मात्रा मे छोटी होगी. और यदि समाज का दायरा बडा होगा तो उसी मात्रा मे व्यक्ति की मर्यादा, उसका दायरा छोटा हो जायेगा. इस तरह रस्साकशी चल रही है. भारत में व्यक्ति को भी मान्यता है और समाज को भी. दोनों में विरोध नहीं. व्यक्ति को पूर्ण सुख और संपूर्ण विकास प्राप्त हो इस तरह की सुविधा समाज को देनी चाहिए और समाज का अनुशासन प्रत्येक व्यक्ति पर लागु हो, यह माना गया. प्रत्येक व्यक्ति अपने सुख और विकास की ओर बढे और दूसरी ओर स्वेच्छा से स्वयं को समाजाभिमुख, समाजकेंद्रित एवं समाजसमर्पित करें. अपने परिपक्व सुख और परिपक्व विकास को समाजपुरुष के चरणों पर अर्पित करें. इस प्रकार व्यक्तिस्वातंत्र्य एवं सामाजिक अनुशासन में तादात्म्य लाने का प्रयास हमारे यहां किया गया.’ (श्री. दत्तोपंत ठेंगडी - एकात्म मानववाद : एक अध्ययन, फेब्रुवारी १९७०, कानपूर)

`पश्चिम में राष्ट्रीयता या राष्ट्रवाद का जन्म प्रतिक्रिया में से हुआ. अत: दो देशों की राष्ट्रीयताओं में एक दुसरे के साथ समन्वय नहीं हो पाता और अंतर्राष्ट्रीयता का तालमेल राष्ट्रीयता के साथ संभव नहीं होता. मुझे स्मरण है- जब विश्व हिंदू परिषद का अधिवेशन चल रहा था तब प्रश्न उठा कि हिंदू की परिभाषा क्या होगी? मै उसकी गहराई में नहीं जाना चाहता. किंतु उसमे एक पहलू यह था की हिंदू को राष्ट्रीय माना जाए या अंतर्राष्ट्रीय, या वह उससे भी उपर है? उसकी परिभाषा कैसे की जाय? इसका उत्तर यह दिया गया कि जिस समय संपूर्ण संसार असंस्कृत था हम ही केवल संस्कृत थे. उस समय हिंदू राष्ट्रवाद विश्व की संस्कृति थी. (world civilisation was identified with hindu nationalism). किंतु उस समय भी हमने अपने राष्ट्रीय हित के लिए दुसरे राष्ट्रों का शोषण करना नहीं सोचा. `कृण्वन्तो विश्वमार्यम’ – हम आर्य है और संपूर्ण विश्व को आर्य बनाएँगे. हम संस्कृत है तो सबको संस्कारित करेंगे. उनके स्तर को ऊँचा उठाएंगे. यह हमारा प्राथमिक भावात्मक राष्ट्रवाद है. जो एक ऐतिहासिक तथ्य है और जिसमे राष्ट्रीयता और अंतर्राष्ट्रीयता में विरोध न होकर वह अंतर्राष्ट्रीयता का आधार बन जाता है. कोई व्यक्ति राष्ट्रीय है इसलिए अंतर्राष्ट्रीय न हो और अंतर्राष्ट्रीय है तो राष्ट्रीय न हो; ऐसा हमारे यहां नहीं दिखता. पश्चिम के लोगों को यह बड़ा विचित्र लगता है. वे कहते है कि परस्परविरोधी बाते कैसे कहते हो. एक ही व्यक्ति राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय दोनों कैसे हो सकता है? लेकिन इसमें विरोधाभास नहीं है.’ (श्री. दत्तोपंत ठेंगडी - एकात्म मानववाद : एक अध्ययन, फेब्रुवारी १९७०, कानपूर)

`धर्म में समाज की धारणा करने की क्षमता है. हजारो वर्ष तक समाज की धारणा इससे हुई है. यह बात ठीक है कि पिछले बारह सौ तेरह सौ वर्षों में बदलती हुई परिस्थितियों के अनुसार समाज की रचना में कौन कौन से परिवर्तन होने चाहिए इस पर विचार नहीं हुआ. इस परिवर्तन शब्द से चौंकने की जरूरत नहीं. क्योंकि ऐसे परिवर्तन समाज में समय समय पर विशुद्ध दर्शन एवं धर्म के आधार पर होते ही रहे है. इस तरह के परिवर्तन करने के लिए जो शांति का समय चाहिए था वह बारह सौ तेरह सौ वर्षों तक न मिलने के कारण कुछ विकृतियाँ, कुछ दोष अपने यहां अवश्य उत्पन्न हुए है. किंतु इन विकृतियों का शल्यकर्म किया जा सकता है. जैसा कि महात्मा गांधी ने कहा कि – रोग का निदान करो, रोगी को समाप्त न करो. जो मूल रचना है वह निर्दोष है. जो विकृति आ गयी है उसका आपरेशन कर दीजिए. किंतु व्यवस्था को कायम रखिए.’ (श्री. दत्तोपंत ठेंगडी - एकात्म मानववाद : एक अध्ययन, फेब्रुवारी १९७०, कानपूर)

`प्रश्न यह है कि पश्चिम की विभिन्न विचारधाराएं नई है तो क्या इसलिए उन्हें प्रगतिशील, आधुनिक और श्रेष्ठ मान लिया जाए? उचित तो यह होगा कि दोनों का तुलनात्मक अध्ययन किया जाय. जो अच्छा हो वही लिया जाय. इस दृष्टी से अपनी जो पद्धति है, अपना जो सनातन धर्म है, वह अन्य पाश्चात्य विचारों की तुलना में आज भी महिमामय है. उसकी विशेषताएं तो बहुत है किंतु आज के संदर्भ में उसको स्पष्ट करते हुए स्व. पंडित जी ने कहा था कि हम एकात्म मानववाद के पुजारी है.’ (श्री. दत्तोपंत ठेंगडी - एकात्म मानववाद : एक अध्ययन, फेब्रुवारी १९७०, कानपूर)

`बचपन के अहंकार से लेकर संन्यासी जीवन की चरमोत्कर्ष अवस्था तक का यह जो सुदीर्घ वैचारिक प्रवास है उसमे जैसे जैसे आत्मचेतना बढती जाती है, वैसे वैसे उसके लिए पुरानी इकाई सब तरह से सत्य होते हुए भी नई इकाई के सत्य का साक्षात्कार उसको होता जाता है. अंतिम साक्षात्कार सर्वं खल्विदं ब्रम्ह का साक्षात्कार संन्यास अवस्था में होता है. दुसरे शब्दों में सभी इकाइयां सत्य है. हमारी आत्मचेतना का जैसे जैसे विस्तार होगा, वैसे वैसे हमारे साक्षात्कार का विकास होगा. सभी सत्य है इस कारण एक दुसरे का तिरस्कार नहीं, उसका परित्याग नहीं और निषेध नहीं होगा. जैसे बिज से अंकुर और अंकुर से पौधा निकलता है तथा वहीँ से शाखा एवं पल्लव निकलते है. उसमे से फुल और फल निकलते है. हर एक का आकार अलग है. अंकुर अलग है, पौधा अलग है, फुल अलग है, फल अलग है. एक दुसरे का संबंध नहीं दिखता. प्रतीत होता है की यह अत्यंत अराजक स्थिति है लेकिन यह अराजक न होकर एक विकासक्रम है. बिज और अंकुर में कोई विरोध नहीं है. इन सबमे कोई विरोध नहीं है. सबसे छोटी इकाई से लेकर सबसे बड़ी इकाई तक एकात्म है. सभी अपने अपने दायरे में सत्य है. कोई एक दुसरे का विरोध नहीं करता. यह भारतीय विचार पद्धति की विशेषता है.’ (श्री. दत्तोपंत ठेंगडी - एकात्म मानववाद : एक अध्ययन, फेब्रुवारी १९७०, कानपूर)

`मनुष्य आर्थिक प्राणी से उपर भी कुछ है. वह शरीरधारी, मनोवैज्ञानिक, राजनीतिक, सामाजिक, धार्मिक प्राणी भी है. उसके व्यक्तित्व के अनेकानेक पहलू है. अत: यदि संपूर्ण व्यक्तित्व के सभी पहलुओं का संगठित और एकात्म रूप से विचार न हुआ तो उसको सुख समाधान की अवस्था प्राप्त नहीं हो सकती. अपने यहां इस दृष्टी से संगठित एवं एकात्म स्वरूप का विचार हुआ है. व्यक्ति की भौतिक, आर्थिक आवश्यकताओं को ध्यान में रख कर यह कहा गया है कि इन वासनाओं की तृप्ति होनी चाहिए, लेकिन यह भी कहा गया कि उन पर कुछ वांछनीय मर्यादा भी आवश्यक है. केवल फ्राइड ने ही काम का विचार अत्यंत गंभीरता से किया है ऐसी बात नहीं है. हमारे यहां भी काम को मनुष्य के अपरिहार्य आवेग के रूप में स्वीकार कर उस पर गंभीरता से विचार किया गया है.’ (श्री. दत्तोपंत ठेंगडी - एकात्म मानववाद : एक अध्ययन, फेब्रुवारी १९७०, कानपूर)

`अर्थ को भी अपने यहां स्वीकार किया गया है. अर्थशास्त्र की भी रचना हुई है. सबके भौतिक आवश्यकताओं की पूर्ति इतनी अवश्य होनी चाहिए कि उसके कारण अपना पेट पालने के लिए व्यक्ति को २४ घंटे चिंता करने की आवश्यकता न हो. उसे पर्याप्त अवकाश मिल सके जिससे वह संस्कृति, कला, साहित्य, भगवान आदि के बारे में चिंतनशील हो सके. इस प्रकार अर्थ और काम को मान्यता देकर भी यह कहा गया कि एक एक व्यक्ति का अर्थ और काम उसके विनाश का कारण न बने या समाज के विघटन का कारण न हो. (इसी एकात्म समग्र चिंतन के फलस्वरूप चतुर्विध पुरुषार्थ की कल्पना का विकास हुआ.) इस समन्वयात्मक, संगठित और एकात्म कल्पना में व्यक्ति का व्यक्तित्व विभक्त नहीं हुआ. वह आत्मविहीन एवं मानसिक दृष्टी से अस्वस्थ प्राणी न बन सका. इस चतुर्विध पुरुषार्थ ने प्रत्येक व्यक्ति को अपनी शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, बौद्धिक क्षमताओं के अनुसार अपना जीवनादर्श चुनने का अवसर दे दिया और साथ ही व्यक्तित्व को अखंड बनाए रखा.’ (श्री. दत्तोपंत ठेंगडी - एकात्म मानववाद : एक अध्ययन, फेब्रुवारी १९७०, कानपूर)

`जहां तक मानव समाज रचना का प्रश्न है, इसका अंतिम अनुक्रम यही हो सकता है- व्यक्ति, परिवार, इसीमे आगे बढ़ते बढ़ते राष्ट्र का राष्ट्रीय शासन और फिर इसी एकात्म मानववाद के आधार पर विश्वराज्य का आविष्कार होगा. वैचारिक जगत में उसका दूसरा तार्किक अनुक्रम अद्वैत सिद्धांत का साक्षात्कार होगा. इस एकात्म मानववाद के अंतर्गत अस्तित्व में आनेवाला विश्वराज्य कम्युनिस्टों के विश्वराज्य से बिलकुल भिन्न होगा. कम्युनिस्टों का विश्वराज्य एक केंद्र पर आश्रित है. हमारा विश्वराज्य अनेक केन्द्रों पर निर्भर होगा. कम्युनिस्ट व्यवस्था में वैचारिक आबद्धता के अंतर्गत एकरूपता दिखाई देगी. किंतु अपने विश्वराज्य में ऐसी थोपी गयी एकरूपता नहीं होगी. एकात्म मानववाद प्रत्येक राष्ट्र को अपनी अपनी प्रकृति और प्रवृत्ति के अनुसार विकास करने की स्वतंत्रता देगा. इस प्रकार प्रत्येक व्यक्ति अपने गुण कर्म के अनुसार विकास कर, विकास का संपूर्ण फल समाजपुरुष को अर्पित करता है, उसी तरह प्रत्येक राष्ट्र अपने को मानवता का अंग समझेगा. हम सभी मानवता के साथ अपने को एकात्म समझ ले और संपूर्ण मानवता की प्रगति के लिए अपने राष्ट्र की जो विशेषताएं होंगी, प्रगति की जो विशेषताएं होंगी, उनका परिपक्व फल मानवता के चरणों में अर्पित करेंगे. इस तरह हर एक राष्ट्र स्वायत्त रहते हुए अपना विकास भी करेगा. किंतु विश्वात्मा का भाव मन में रहने के कारण एक दुसरे का पोषक, संपूर्ण मानवता का पोषक विश्वराज्य पंडित दीनदयालजी के एकात्म मानववाद की रचना की दृष्टी से चरम परिणति होगी. इसी भांति वैचारिक क्षेत्र में अद्वैत का साक्षात्कार तर्कशुद्ध परिणति है.’ (श्री. दत्तोपंत ठेंगडी - एकात्म मानववाद : एक अध्ययन, फेब्रुवारी १९७०, कानपूर)

- श्रीपाद कोठे

१० ऑक्टोबर २०२०

आठवण दत्तोपंतंची

लवकरच स्व. दत्तोपंत ठेंगडी यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यांनी स्वतःच सांगितलेली एक आठवण -

कामगार क्षेत्रात काम सुरू करायचं, संघटना उभी करायची असं निश्चित झालं. पण त्याबाबत माहिती, अनुभव काहीच नव्हतं. तेव्हा त्यासाठी कामगार क्षेत्रात आधीपासून असलेल्या इंटक या संघटनेत काही दिवस काम करण्याचं ठरवलं. १९५० च्या डिसेंबर महिन्यात त्यांची इंटकच्या जनरल कौन्सिलवर निवड झाली. त्यांनी स्व. भय्याजी दाणी यांना ती बातमी सांगितली. भय्याजी त्यांना गोळवलकर गुरुजींकडे घेऊन गेले. गुरुजींनी सगळं ऐकून घेतलं. सगळी माहिती विचारली. अन एक प्रश्न विचारला - 'तुम्ही कोणत्या मजुरांचे प्रतिनिधी म्हणून कौन्सिलवर गेले आहात?' दत्तोपंतांनी सांगितले - 'मँगनीज कामगार.' गुरुजींनी पुढे विचारले - 'किती सदस्य आहेत?' दत्तोपंत म्हणाले -'तीस हजार.' त्यावर गुरुजींनी विचारले - 'तुमची आई ज्या उत्कटतेने तुमच्यावर प्रेम करते तेवढ्याच उत्कटतेने तुम्ही या तीस हजार मजुरांवर प्रेम करता का? खरेखरे सांगा.' दत्तोपंतांनी उत्तर दिले - 'हो म्हणू शकत नाही.' त्यावर गुरुजी म्हणाले - 'मग तुम्ही इंटकच्याच जनरल कौन्सिलचे सदस्य बनू शकता, भगवंताच्या जनरल कौन्सिलचे नव्हे.'

गुरुजींनी त्यांना कामगार संघटनेच्या विषयात महात्मा गांधी आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा तौलनिक अभ्यास करण्यास सांगितले. या दृष्टीने काय वाचन सुरू आहे याची चौकशीही गुरुजी करीत असत.

(गुरुजींच्या निधनानंतर नागपूरच्या भारतीय विचार साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'श्री गुरुजी समग्र दर्शन' या ग्रंथमालिकेच्या तिसऱ्या खंडात ही आठवण आहे.)

- श्रीपाद कोठे

१० ऑक्टोबर २०१९

शक्तीरूपेण संस्थिता (४)

आजूबाजूला एक नजर टाकली तरीही एक गोष्ट लगेच ध्यानी येते. ती म्हणजे, जगात सगळीकडे शक्तीसंचय सुरू आहे. शक्ती अर्जन सुरू आहे. व्यक्ती असो, समूह असो, देश असो, संस्था असो, संघटना असो; सर्वत्र शक्तीसंचय सुरू आहे. स्त्रिया, पुरुष, बालके, तृतीय पंथी, विविध भाषा, विविध व्यवसाय, विविध उद्योग, विविध मठ मंदिरे; सगळे शक्तीचा संचय करीत आहेत. पण या शक्तीसंचयाला शक्तीची उपासना म्हणता येईल का? दुर्दैवाने तसे म्हणता येत नाही. शक्तीसंचयाला सर्वमंगलाची जोड असेल तरच त्याला शक्तीची उपासना म्हणता येईल. अन शक्तीची उपासना असेल तरच शक्ती सुखदा होईल. अन्यथा नाही. कोणत्या देशाची शक्तीसाधना आज शक्तीउपासना म्हणता येईल? किंवा व्यक्ती जीवनातील शक्तीसाधना किती प्रमाणात शक्ती उपासना असेल? व्यक्ती जीवनात निश्चितच काही प्रमाणात शक्तीची उपासना पाहायला, अनुभवायला मिळेल. परंतु व्यक्तीजीवनाचा एकूण प्रवाह, जगण्याच्या प्रेरणा, जीवनाची मूल्ये, सामाजिक मान्यता असलेल्या जीवनाच्या कल्पना आणि धारणा; या शक्तीसंचयाला उपासना म्हणू देत नाहीत. व्यक्तीच्या आणि समूहाच्या आर्थिक आकांक्षा, कुरघोडीची सामाजिक चढाओढ, राजकीय वर्चस्वाची स्पर्धा, शस्त्रास्त्रांचे भांडार, स्वातंत्र्य समता आदी मूल्यांचा स्वार्थी वापर; अशा असंख्य गोष्टी आहेत; ज्या शक्ती संचयाला सर्वमंगलाच्या दिशेने जाऊ देत नाहीत. सगळं मीच करणार, सगळं मलाच मिळायला हवं, सगळं माझ्या मालकीचं; यासाठीच सगळ्या प्रकारच्या शक्तीचे अर्जन. अन या शक्तीच्या अर्जनासाठी तामसी शक्तींचा अपरिमित वापर हाच वर्तमान युगधर्म असल्याचे चित्र पाहायला मिळते. हा 'मी' एक व्यक्ती असेल किंवा एखादा समूह किंवा एखादा देश. म्हणूनच आर्थिक, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, वैज्ञानिक, कलात्मक, धार्मिक, लष्करी, शैक्षणिक, ज्ञानाचा; अशा सगळ्या शक्तीसंचयानंतरही व्यक्तिगत किंवा सामूहिक सुखाचे आणि आनंदाचे प्रमाण समाधानकारक नाही. हा शक्तीसंचय सुखदा होण्यासाठी शक्तीची उपासना व्हायला हवी. त्यासाठी शक्तीसंचयाला सर्वमंगलाची जोड हवी. ही जोड कशी देता येऊ शकेल?

- श्रीपाद कोठे

१० ऑक्टोबर २०२१

लहान मूल

प्रत्येक स्त्री पुरुषाचा कुठे ना कुठे लहान मुलांशी संबंध येत असतोच. त्यांचे वागणे, स्वभाव, वैशिष्ट्ये, दुबळेपणा, खोडकरपणा याचाही अनुभव येत असतोच. अन त्यांच्या डांबरटपणाचाही अनुभव येतो. कधीकधी मुलाची खोडी, चूक, बदमाशी पकडली जाते. त्यावेळी तो बेमालूमपणे विषय टाळतो, विषयांतर करतो किंवा रडतो, चिडतो, त्रागा करतो किंवा अपवादाने का होईना हसून देतो. तो मान्य मात्र करत नाही. हे झालं बाहेरच्या लहान मुलाबद्दल. पण प्रत्येकाच्या आत स्वत:चीच प्रतिकृती वाटावी असं लहान मुल दडलं असतं. त्याच्या खोड्या, चुका, बदमाशी अन्य कोणाला समजण्याची शक्यता नसते. त्या आपल्या आपल्यालाच समजतात. कोणापुढे लाज वाटण्याची, कमीपणा वाटण्याची, ओशाळवाणे वाटण्याची, खाली पाहावे लागण्याची शक्यता नसते. तरीही व्यक्ती बाहेरच्या लहान मुलाप्रमाणेच विषय टाळणे, विषयांतर करणे, रडणे, चिडणे, त्रागा करणे किंवा अपवादाने हसून देणे या गोष्टी करते. कधी त्यातून धडा घेऊन पुढे जाते. मात्र पुष्कळदा धडा घेतही नाही. असे करावे, न करावे? ज्याचा त्याचा प्रश्न, ज्याचे त्याचे उत्तर.

- श्रीपाद कोठे

९ ऑक्टोबर २०१५

धार्मिक परिवर्तन

शबरीमला प्रकरणी पुनर्विचार याचिका करण्यात आल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या विषयावर होणाऱ्या चर्चेत अनेक विषय आणि पैलू येतात, पण व्रत आणि तप हे दोन पैलू येत नाहीत. रूढी, परंपरा, मान्यता, समज यापेक्षा व्रत आणि तप खूप वेगळे आहे. सामाजिक परिवर्तनाच्या भोंगळ झाडूने झाडणे थांबवले पाहिजे. हिंदुत्वनिष्ठ मंडळी सुद्धा अभारतीय विचारांची शिकार झालेली आहे. 'आदर्श समाज' 'समाज परिवर्तनाचे स्वप्न' इत्यादी भंपकपणा आहे. अनेक गोष्टींच्या मूळ धारणात भारत आणि अन्य जग यांच्यात खूप फरक आहे. समाज, देश, माणूस, माणूस व समाज यांचा संबंध, देशभक्ती, सामाजिकता अशा अनेक बाबतीतही हा फरक आहे. याविषयीच्या भारतीय धारणा केवळ भारतीय आहेत म्हणून स्वीकाराव्यात वा श्रेष्ठ आहेत असे नाही. पण भारतीय व अभारतीय धारणांची चिकित्सक मांडणी व्हायला हवी ती होत नाही. जवळजवळ १०० टक्के अभारतीय कल्पना, धारणा, समजुती घेऊनच आपण चालतो आहोत. शासन, प्रशासन, घटना, कायदे, न्यायव्यवस्था, jurisprudence, कल्पना, समजुती; या सगळ्या गृहित धरून चालण्यापेक्षा चिकित्सा करून मांडल्या जाव्यात.

- श्रीपाद कोठे

९ ऑक्टोबर २०१८

प्रसार माध्यमांचा उपयोग

सकाळपासून दोन गोष्टी आठवत आहेत.

१) दोन दशकांपूर्वी लोकसत्ता दैनिकाने चालवलेली भ्रष्टाचाराविरुद्धची मालिका. काही महिने चाललेल्या या उपक्रमात रोज वेगवेगळी भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि दर रविवारी पहिल्या पानावर अग्रलेख. शीर्षक होतं - भ्रष्टाचाराचे भेद किती?

- भ्रष्टाचाराचं काय झालं?

२) तीन दशकांपूर्वी त्यावेळचे times of india चे संपादक गिरीलाल जैन यांनी लिहिलेले secularism चा समाचार घेणारे अनेक लेख. ते लेख इतके प्रभावी होते की, संघाच्या लोकांनी त्या लेखांची पुस्तिका काढली होती. गिरीलाल जैन हिंदुत्ववादी नव्हते हे विशेष.

- secularism वर अजूनही चर्चा सुरूच आहे.

***************

- 'प्रसार माध्यमे, चर्चा यांचा उपयोग आणि परिणाम' हेदेखील आपल्या समजून घेण्याचे विषय व्हायला हवेत. नाही का?

- समस्या सोडवायच्या असतात की चघळायच्या असतात? ठरवलं पाहिजे. नाही का?

- समस्या सोडवण्याच्या वेगळ्या प्रयत्नांचा, वेगळ्या पद्धतींचा विचार केला पाहिजे. नाही का?

- श्रीपाद कोठे

९ ऑक्टोबर २०२१

शक्तीरूपेण संस्थिता (३)

सर्वमयी शक्तीचे आविष्कार कमीअधिक प्रमाणात आणि विविध प्रकारचे असतात, त्याचप्रमाणे परस्पर विरोधी असेही असतात. करुणा हादेखील शक्तीचा आविष्कार आहे आणि क्रौर्य हादेखील शक्तीचा आविष्कारच. भोग आणि त्याग दोन्ही शक्तीचेच आविष्कार. सक्रियता आणि संयम, कर्मशीलता आणि कर्मत्याग; सगळेच शक्तीचे आविष्कार. एकच शक्ती जर अशी परस्परविरोधी रुपात प्रकट होत असेल तर काय योग्य आणि काय अयोग्य? काय स्पृहणीय आणि काय त्याज्य? काय चांगलं आणि काय वाईट? ठरवायचं कसं? निर्णय कसा करायचा? त्याची कसोटी आहे सर्वमंगल. सर्वमंगलाची कामना, हेतू आणि प्रयत्न यासाठी होणारा शक्तीचा आविष्कार प्रणम्य ठरतो. याउलट सर्वमंगलाला छेद देणारा आविष्कार त्याज्य ठरतो. अगदी सर्वत्र, सर्वकाळी गौरवले गेलेले मातृत्वदेखील याला अपवाद ठरत नाही. म्हणूनच कैकेयीचे मातृत्व प्रणम्य ठरत नाही आणि राणी लक्ष्मीबाईचे मातृत्व प्रणम्य ठरते. राधेचे प्रेम प्रणम्य ठरते तर शूर्पणखेचे प्रेम प्रणम्य ठरत नाही. वर्तमानाचा विचार करतानाही मुलांना गैरमार्गापासून न रोखणारे मातृत्व गौरवास्पद नाही ठरू शकत. परंतु सर्वमंगलाचा हा निर्णय सोपा नसतो. अनेक पण परंतु त्यात असतात. गरजा, परिस्थिती, क्षमता, दबाव असे अनेक परिणाम करणारे घटक असू शकतात. अन ही आजची समस्या नाही. संत मीराबाईने तर म्हणूनच ठेवले आहे 'करम की गती न्यारी'. त्यामुळे सर्वमंगलाचा निर्णय कठीण असला तरीही तो अशक्य मात्र नाही. कृती करणाऱ्याचा कमीतकमी स्वार्थ, स्वतःच्या लाभहानीचा किमान विचार, मानापमानाचा अत्यल्प विचार; अशा काही गोष्टींच्या आधारे सर्वमंगलाचा निर्णय करता येऊ शकतो. सर्वमंगलाचा याचा अर्थ प्रत्येक वेळी सगळ्या जगाचा असा नाही. तर संबंधित सगळ्यांच्या मंगलाचा असा त्याचा अर्थ योग्य ठरेल. अशा प्रकारचा सर्वमंगलासाठीचा शक्तीचा आविष्काराच चांगला म्हटला जातो. सर्वमंगलाचा नसलेला शक्तीचा आविष्कार चांगला म्हटला जात नाही.

- श्रीपाद कोठे

९ ऑक्टोबर २०२१

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

शक्तिरूपेण संस्थिता (२)

सर्व भूतांच्या ठायी वास करणारी अनंतरूपा शक्ती, सार्वत्रिक असते. शक्ती नाही अशी टीचभरही जागा ब्रह्मांडात सापडणार नाही. सगळे देश, सगळे वेष, सगळ्या भाषा, सगळी भोजनं, सगळे भाव, सगळ्या कृती; शक्तीचा आविष्कार असतात. हे शक्तीचं पहिलं वैशिष्ट्य आहे. शक्तीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे - शक्तीच्या आविष्काराचा हा प्रकार एकच असला तरीही त्याचे प्रमाण मात्र वेगवेगळे असते. कमी अधिक असते. हे प्रमाण सारखे नसते. म्हणूनच गायनाची शक्ती असलेले सगळेच पंडित जसराज, भीमसेन जोशी, प्रभा अत्रे, किशोरी आमोणकर किंवा लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, मोहंमद रफी, मुकेश, सुधीर फडके नाही होत. गायनाची शक्ती असलेले चांगले गायक, गायिका होऊ शकतात पण सगळेच एका मापाचे होऊ शकत नाहीत. खूप प्रयत्न केले तरीही. हे अन्य गोष्टींनाही लागू होतं. शक्तीच्या आविष्काराचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे - ती सर्वत्र असली तरी एकाच साच्यातली, एकाच गुणाची नसते. एकाच ठायी आर्थिक शक्ती, गायन शक्ती, कवित्व शक्ती, शरीर श्रमाची शक्ती, प्रशासन शक्ती, प्रेम शक्ती; अशा सगळ्या शक्ती असतात असं नाही. किंबहुना नसतातच. एकाहून अधिक शक्ती एकाच ठायी असू शकतात. परंतु हे प्रमाणही कमी असतं. सगळ्या शक्ती एकत्र हे तर नसतंच. त्यामुळेच सर्वगुण संपन्न होण्याचा ध्यास, अट्टाहास आणि प्रचलन अनेकदा निरुपयोगी तर अनेकदा हास्यास्पद ठरतात.

शक्तीच्या आविष्काराची ही विविधता आणि त्यांचे विषम प्रमाण ही वास्तवता असल्यानेच, कोणताही गुण, कला, शक्तीचा कोणताही आविष्कार यांची तुलना करणे, त्यांच्यात डावे उजवे करणे, त्यांची वर्गवारी करणे, त्या आधारे द्वेष, शोषण इत्यादी करणे; हे योग्य ठरत नाही. शिवाय प्रत्येकाला सगळ्या शक्तींची गरज नसते तरीही एकाहून अधिक शक्तींची गरज असतेच. जगण्यासाठी, सुखासाठी, आनंदासाठी, पूर्णतेसाठी; एकाहून अधिक शक्ती आवश्यक असतात. म्हणूनच क्षुद्रहृदयी संघर्षापेक्षा सहृदयी समन्वय उपयोगाचा आणि योग्य ठरतो. सहकार्य इत्यादी या समन्वयी वृत्तीचेच प्रकार, तर स्पर्धा हा अयोग्य अशा संघर्षाचा प्रकार.

शक्तीच्या या आविष्काराबद्दल दृष्टी कोणती आहे आणि हेतू काय आहे, यावरून तो आविष्कार प्रणम्य आहे की नाही हे ठरतं.

- श्रीपाद कोठे

८ ऑक्टोबर २०२१

सुचित्रा सेन यांची इच्छा

शोधता शोधता, १७ जानेवारी २०१४ च्या डीएनए वृत्तपत्रात बातमी वाचायला मिळाली की, प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन यांची अखेरची इच्छा होती की, आपल्याला सारदा मां (श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या सहधर्मचारिणी) यांची भूमिका करायला मिळावी. अन का वाटू नये असे? आपल्या दांपत्य जीवनाबद्दल मां सांगत असत, त्यांनी (श्रीरामकृष्णांनी) मला कधीही `तू' म्हटले नाही. (हा काळ लक्षात घ्यावा. श्रीरामकृष्ण- १८३६ ते १८८६, सारदा मां - १८५३ ते १९२०) मां देखील प्रखर आध्यात्मिक साधक होत्या. पौर्णिमेच्या दिवशी गच्चीवर जाऊन त्या प्रार्थना करीत असत. `ईश्वरा या शुभ्र चंद्रावरही डाग आहेत. माझ्या मनावर मात्र तेवढेही डाग राहू देऊ नको. अन त्याच्या शीतल प्रकाशाहूनही शीतल अशी माझी वृत्ती कर.'

- श्रीपाद कोठे

८ ऑक्टोबर २०१५

बाहेरील आणि आतील

दोन प्रकारची माणसे आजूबाजूला पाहायला मिळतात. एक म्हणतात, आपण आपलं व्यवस्थापन नीट, चोख करावं. बाह्य गोष्टींकडे लक्ष देऊ नये. दुसरे काही म्हणतात, बाहेरील परिस्थिती, वातावरण, साधने बदलली पाहिजेत. या दोन्ही गोष्टी सत्य अन आवश्यक नाहीत का? म्हणजे असं की, मी माझ्या तब्येतीची काळजी घेतो, नीट खुराक घेतो, व्यायाम वगैरे करतो. पण मी राहतो त्या इमारतीच्या दारावर नेहमीच कचऱ्याचा ढीग असतो, गुरेढोरे फिरत असतात, माशा-किडे असतात. चालेल का? किंवा मी राहतो तो सगळा परिसर, ती इमारत, माझा निवास सगळे छान स्वच्छ, नीटनेटके, आरोग्यदायी. पण मी व्यायाम करत नाही, खाणेपिणे योग्य नाही, तब्येतीची काळजी घेत नाही. चालेल का? बाहेरील अन आतील दोन्ही आवश्यक नाही का? मला तरी तसे वाटते.

- श्रीपाद कोठे

८ ऑक्टोबर २०१५

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०२२

शक्तीरूपेण संस्थिता (१)

शक्ती उपासनेच्या दोन नऊरात्री. त्यातील यावर्षीच्या अश्विनी नवरात्राची आज सुरुवात. जगदंबेला नमन करताना म्हटलं जातं - 'या देवी सर्वभूतेषु'. त्यानंतर जगदंबेच्या स्वरूपाचा उल्लेख येतो. अन शेवटी नमन. म्हणजे सर्व भूतांच्या ठायी असलेल्या त्या त्या स्वरूपाला जगदंब भावाने नमन. केवळ स्त्रियांच्या ठायी वास करणाऱ्या स्वरूपाला नाही. स्त्री, पुरुष, तृतीय पंथी, पशू, पक्षी, प्राणी, निसर्ग; सगळ्यांच्या ठायी वास करणाऱ्या जगदंबेच्या स्वरूपांना वंदन.

सर्व भूतांच्या ठायी ज्या ज्या स्वरूपात जगदंबा वास करते त्यातील एक स्वरूप आहे शक्ती. शक्ती त्रिविधा असते. म्हणजे तीन प्रकारची असते. सात्त्विक, राजसी, तामसिक. अथर्वशीर्षातही म्हटलं आहे- त्वं शक्ती त्रयात्मिका. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली ही त्या शक्तीची साकार रूपं.

या तीन मूळ शक्तींचा अनंत रूपातील विलास जीवनात पाहायला मिळतो. बौद्धिक, शारीरिक, मानसिक, आत्मिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक अशा विविध शक्ती असतात आणि अनुभवाला येतात. आकर्षण व अपकर्षण या शक्ती आहेत. सौंदर्य ही शक्ती आहे. आनंद ही शक्ती आहे. अन्नपूर्णा ही शक्ती आहे. संगीत, नृत्य, नाट्य, काव्य, वक्तृत्व, लेखन, संवाद, मेधा, संघटन, एकांत, सातत्य, प्रेम, काम, लौकिक, दैवी, आध्यात्मिक, अभ्यास, ध्यान, उपासना, धर्म, कर्म, सैन्य, विद्युत, समर्पण, संघर्ष, समन्वय; एवढंच काय; वाफ, प्रकाश, अंधार याही शक्ती आहेत. होय, अंधार देखील. संध्याकाळी झाडावर, वेलीवर दिसणाऱ्या कळ्या, प्रकाश पसरला की फुल झालेल्या दिसतात. कळीचं फुल करणारी ही शक्ती अंधारशक्ती असते. गर्भ सुद्धा नऊ महिने अंधारातच वाढतो. अशी ही शक्ती अनंतरूपा असते. सर्वत्र, सर्वांठायी वसणाऱ्या या अनंतरूपा शक्तीला नमन.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, ७ ऑक्टोबर २०२१

मोकळेपणा

मोकळेपणा हा दैवी प्रसाद असतो. अन थोड्याच लोकांना तो मिळालेला असतो. मोकळ्या मनाचे, मोकळ्या वृत्तीचे असं ज्यांना समजलं जातं तेही पुष्कळदा चुकीचं असतं. मोकळेपणा म्हणजे कुढणं, अपार सहन करणं वगैरे वगैरे तर नाहीच; पण मोकळेपणा म्हणजे गडबड गोंधळ, बडबड, फटकळपणा इत्यादी सुद्धा नाही. मोकळेपणा ही खूप परिपक्व, गंभीर आणि सखोल गोष्ट आहे. तो ईश्वरी प्रसादच असतो.

- श्रीपाद कोठे

७ ऑक्टोबर २०२१



बुधवार, ५ ऑक्टोबर, २०२२

तरीही

दोन गंमती जाणवल्या.

हृतिक रोशन आणि कंगना राणावत यांचा वाद सुरु आहे. दोघेही १) सधन, २) सुशिक्षित, ३) आधुनिक, ४) स्त्री-पुरुष समानता मानणारे, ५) स्वतंत्र, ६) स्वत:च्या पायावर उभे असलेले, ७) गुणवान, कर्तृत्ववान. (एवढं पुरे नं...)

तरीही...

बाबा राम रहीमच्या डेरा सच्चामध्ये सगळ्यांना `इन्सान' लावतात. सगळे फक्त `इन्सान'. जात, धर्म, कुळ, स्त्री, पुरुष, पंथ, संप्रदाय, उपाध्या सगळ्यांची सुट्टी. तरीही...

...तरीही, सगळे भेद बुडवून टाका. सगळ्यांना शिक्षण, स्वातंत्र्य, आधुनिकता, सुखसोयी देऊन टाका. आणि...

सहज एक म्हण आठवली- `जखम डोक्याला, पट्टी पायाला'

- श्रीपाद कोठे

६ ऑक्टोबर २०१८

प्रश्न व्यवस्थांचा

दिनकर मनवर यांच्या कवितेसंबंधात मी परवा एक पोस्ट आणि आज एक कविता पोस्ट केले. आज कवीचे स्वतःचे मनोगत वाचले. त्याला अनुसरून व्यापक परिघासाठी काही गंभीर मुद्दे-

- व्यवस्थात्मक जीवनाच्या विरोधात, सभ्यतेच्या संबंधात वेगळा विचार मांडणारा एक वर्ग आहे.

- व्यवस्था म्हटले की मर्यादा अपरिहार्यपणे येते. ती टाळणे अशक्य. व्यवस्था जितकी लहान तितकी ती मोकळी आणि त्यात वाट्याला येणारा अवकाश मोठा.

- आजच्या व्यवस्था दीर्घकाळ वाटचाल करीत जटील आणि महाकाय झाल्या आहेत.

- त्याच वेळी हेही खरे आहे की त्यांनी अनेक सकारात्मक, जीवनपोषक अशा गोष्टीही केल्या आहेत.

- मात्स्यन्याय कमी केला आहे. किमान लहान माशाला काही संधी दिल्या आहेत. मोठ्या माशांच्या मनात लहान माशांच्या संबंधात मऊ कोपरा काही प्रमाणात निर्माण केला आहे.

- ज्ञान, विज्ञान, जग, साधने, जगणे हे तर कोणीही नाकारू शकत नाही. हजारो मैलांवर आलेल्या भूकंपात धावून जाण्याची, कधीही न देखलेल्या कुपोषितांसाठी अन्नाचा घास काढून देण्याची आंतरिक संपन्नताही दिलेली आहे.

- व्यवस्थात्मक जगण्याला विरोध करणाऱ्यांना हे सारे सोडून द्यायचे आहे का? व्यवस्थेने मानवाला दिलेले दृश्य आणि अदृश्य नाकारायचे आणि टाकून द्यायचे आहे का?

- भारतीय संदर्भात व्यवस्था म्हणजे उच्च जाती आणि त्यांचा दुष्टपणा असे सोपे आणि बाळबोध समीकरण योग्य आहे का?

- व्यवस्थांनी केलेला कोंडमारा ही फक्त भारतीय व्यथा आहे का?

- व्यवस्थांनी केलेला कोंडमारा ऐहिक जीवनाचा आणि जीवनजाणिवांचा आहे की ऐहिकतेहून वेगळा?

- abstract हा शब्दच मुळात ऐहिकतेपेक्षा अधिक कशाचा तरी संकेत करीत नाही का?

- ऐहिकतेपेक्षा वेगळ्या, abstract, अदृश्य जाणिवांची उत्तरे वा समाधान दृश्य, ऐहिक संदर्भात, प्रतिकात, घटनांत, जगण्यात शोधण्याचा आक्रोशपूर्ण आटापिटा कितपत योग्य म्हणावा?

- मानवी बुद्धी, मानवी प्रयत्न, मानवी जाणीवा यांचे अपुरेपण स्वीकारायला; त्यांची मर्यादा स्वीकारायला नकार देण्याचा आडमुठेपणा सोडून द्यायला हवा की नको?

- हा आडमुठेपणा सोडल्याशिवाय पुढे जाता येईल का?

- श्रीपाद कोठे

६ ऑक्टोबर २०१८

चांगला समाज

न्याय मिळवणे, त्यासाठी संघर्ष; या चांगल्याच गोष्टी आहेत. पण न्याय मिळवण्याची गरजच पडणार नाही कारण अन्यायच नसेल, असं जीवन उभं करण्याचा प्रयत्न करणं; हे अधिक चांगलं. असं जीवन उभं करण्याचे अनेक पैलू असतील आणि त्यातील पुष्कळ आपल्याशी व्यक्तिशः संबंधित असतील. पुष्कळ गोष्टी व्यक्तिशः आपल्या हातीही असतील. विश्वास निर्माण करणे, वातावरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न, प्राधान्य आणि भर देण्याच्या गोष्टी; या आपल्याशी संबंधित असू शकतात. १०० टक्के आदर्श समाज असू शकत नाही हे खरेच, पण समाज १०० टक्के आदर्श असावा असा प्रयत्न केला तरच तो अधिक प्रमाणात चांगला होऊ शकेल. आपल्या स्वतःसकट कोणीही येतानाच सज्जनतेचं वा दुर्जनतेचं प्रमाणपत्र घेऊन येत नाही. आपण स्वतः जसं चांगलं होण्याचा प्रयत्न करतो तसाच सगळ्यांनी करावा, हीच चांगल्या समाजाच्या निर्मितीची दिशा असू शकते. आपल्या प्रयत्नांचा किमान ५० टक्के भाग यासाठीच असावा. तसं नसेल तर फार काही आशा ठेवू नये.

- श्रीपाद कोठे

६ ऑक्टोबर २०२०

`गायीमध्ये कोणाचीही आई नसते.'-

गायीमध्ये कोणाचीही आई नसते.'- न्या. मार्कंडेय काटजू.

न्यायमूर्ती महोदय, बरोबर आहे तुमचे म्हणणे. पण हेही खरे की तुमची आईसुद्धा तुमची आई नाही. ती एक बाई आहे अन तिने तुम्हाला जन्म दिला आहे. जसे गाय वासराला जन्म देते, वाघीण आपल्या पिल्लांना जन्म देते, चिमणी छोट्या छोट्या चिमण्यांना जन्म देते; तसेच. अगदी तसेच. कोणताही पशु वा पक्षी जन्म देणाऱ्या मादीला `आई' कुठे म्हणतो? फक्त माणूसच म्हणतो- `आई'. चुकीचे आहे ते. माणसाने `आई' म्हणणं सुरु केलं अन तो सभ्य झाला. पण मुळात ही सभ्यता वगैरे कृत्रिम गोष्टी आहेत. भावना, नाती वगैरे निरर्थक अन झूठच. हा सभ्यतेचा प्रवास अर्ध्यावर आहे, अन तो पूर्ण व्हावा असं वाटणारे लोक गायीला माता मानायला शिकवतात, पृथ्वीला माता मानायला शिकवतात, नद्यांना माता मानायला शिकवतात... आणखीन कोणास ठाऊक कशाकशाला माता म्हणायला शिकवतील. पण मुळात सभ्यता अन मनाला वळण लावणारे संस्कार ही गोष्टच कृत्रिम अन म्हणूनच चुकीची असल्याने ती मोडून काढायला हवीच. फक्त एकच विनंती- तुमचा आदिमतेचा प्रवास मधेच गायीवर थांबवू नका, पुढे बाईकडेही चालू द्या. अन चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासून करावी म्हणतात ना... तेव्हा घ्या पुढाकार.

- श्रीपाद कोठे

५ ऑक्टोबर २०१५

कला क्षेत्राची तेरवी

विचार, तर्कशुद्धता, संवेदना, सामाजिक भान आणि जाण यांच्यापासून फारकत घेणारी कला, कलाकार, कलाविचार, कलाविश्लेषण, कलातत्वज्ञान यांची तेरवी जेवढ्या लवकर होईल तेवढे चांगले. (नशा करून तमाशे करणाऱ्या सध्याच्या कलाकारांच्या उपद्व्यापांचा या मताला पूर्ण संदर्भ आहे.) एकेकाळी कम्युनिस्ट वगैरे समजले जाणारे कलाकार, गीतकार इत्यादी सुद्धा भारतीयता, मूल्य आदी गोष्टींना जपत असत. अरबी पेट्रो डॉलर्स बॉलीवूडला पोसू लागल्यापासून बॉलीवूडने सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक दृष्टीने फक्त नुकसान आणि नुकसानच केले आहे. हे बॉलीवूड जेवढ्या लवकर नामशेष होईल तेवढे चांगले. राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून तुमच्या माझ्यापर्यंत सगळ्यांनी यासाठी आपापले प्रयत्न करावेत. ज्या तरुणाईचं सतत खूप कौतुक चालतं त्या तरुणाईनेही बॉलीवूडला आपल्या जीवनातून हद्दपार करावे. तरुणाईची नुसती झिंग असून चालणार नाही. तरुणाईने विचारीही व्हावे.

- श्रीपाद कोठे

५ ऑक्टोबर २०१६

गंमतीशीर अर्णव

गमतीशीर होण्याला मर्यादाही नाही अन बंधनही नाही. राम मंदिरासाठी अध्यादेश आलाच तर तो शहाबानो अध्यादेशासारखा म्हणता येईल का? शहाबानो अध्यादेश लाखो मुस्लिम महिलांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारा होता. राम मंदिरावर अध्यादेश आला तर तो कोणत्याही समाजाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा नसणार. तो ५०० वर्षांचा संघर्ष आणि अन्याय दूर करणारा राहील. पण एवढा विचार करण्याचे अर्णवला काय कारण? त्याने गमतीशीर व्हायचे ठरवलेच आहे !!

- श्रीपाद कोठे

५ ऑक्टोबर २०१८

दुर्गांना आवाहन

सुखाच्या आणि आनंदाच्याच नव्हे तर प्रतिष्ठेच्या, सन्मानाच्या, मानापमानाच्या कल्पना सुद्धा सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनावर बरावाईट प्रभाव टाकत असतात. पर्यावरण ही गोष्ट सुद्धा त्याला अपवाद नाही. या कल्पना बदलणं, गळी उतरवणं हे देखील मोठं आणि प्राधान्याचं काम आहे. यात महिलांचा सहभाग मोठा राहू शकतो एवढंच नाही तर त्याच हे काम खऱ्या अर्थाने करू शकतात. सध्या दुर्गेचा जागर सुरू आहे. सगळ्या दुर्गांनी कल्पना बदलण्याच्या कामाचा हा विडा उचलायला हरकत नाही. त्या उचलतील का ठाऊक नाही अपेक्षा मात्र आहे. (बाकी दुर्गा माझ्यावर कायमस्वरूपी नाराज असतात हा भाग वेगळा.) ☺

- श्रीपाद कोठे

५ ऑक्टोबर २०१९

सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२

गोडसे

महेश मांजरेकरच्या नवीन चित्रपटाच्या घोषणेनंतर पुन्हा एकदा शिळ्या कढीला उत आलेला आहे. ज्यांना प्रामाणिकपणे विषय माहिती नसेल त्यांच्यासाठी - नथुराम गोडसे. चित्रपट २०२२ मध्ये सुरू होणार आहे म्हणजे २०२३ उजाडेल. तोवर तरी कढी उकळत राहील. सहज एक मनात आलं - गोडसेने माउंटबॅटनला का नाही मारलं? असे प्रश्न निरर्थक आहेत हे मला नीट कळतं. कारण अस्थिर मनाला अशी चिकित्सा लागू होत नाही. शिवाय आपला राग काय होता हे स्वतः गोडसेने सांगितलं असल्यामुळे त्यावर वाद घालण्यातही अर्थ नाही. एवढंच वाटतं की, गोडसेने फाळणी टाळण्यासाठी काहीतरी करायला हवं होतं. ते अधिक चांगलं झालं असतं. असो.

- यानिमित्ताने होणाऱ्या चर्चेत संघ गांधींचा विरोधक होता आणि मजबुरीने संघाला एकात्मता स्तोत्रात गांधींना स्थान द्यावे लागले, अशीही चर्चा होते. अशी चर्चा करणारे हिंदुत्वाचे समर्थक आणि विरोधक दोन्ही बाजूंचे असतात. पण हे चुकीचे आहे हे सगळ्यांनी मोकळ्या मनाने नीट समजून घेतले पाहिजे.

- श्रीपाद कोठे

४ ऑक्टोबर २०२१

आजच्या तीन लक्षणीय गोष्टी.

१) उत्तर प्रदेशातील हत्येच्या प्रकरणात मृतकाच्या परिवाराला अखिलेश सरकार ४५ लाख रुपये देणार.

(देशात रोज शेकडो खून होतात. सगळ्या सरकारांचे बजेट वाढतील आता. गुंडांनी गुंडगिरी करायची अन आपण भोगायचे. मदत करण्यासाठी काही निकषबिकश असण्याची काय गरज? राजा उदार असला म्हणजे झाले.)

२) आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील तमाशा. कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी चक्क दिवाळीतील रॉकेटसारखे रॉकेट तयार करून त्यात कबुतर भरले. अन त्याची वाट पेटवून वर आकाशात पाठवले. आकाशात रॉकेटचा स्फोट झाला. कबुतरांचे काय झाले असेल आपण समजू शकतो. काय म्हणावे याला? बिनडोकपणा. राक्षसीपणा. उन्मत्तता. उन्माद. रानटीपणा. लोक तयार आहेत वा नाहीत हे न पाहता जी लोकशाही बोडक्यावर लादण्यात आली त्याचे तर हे परिणाम नाहीत?

३) एका गरबा मंडळाने (बहुतेक मध्य प्रदेशात) सहभागी होण्यासाठी अंगावर गोमूत्र शिंपडून व टिळा लावून येण्याचे बंधन घातले आहे. लगेच सार्वत्रिक राष्ट्रीय कावकाव सुरु झाली आहे. त्या मंडळाने लोकांनी त्यांच्या गरबा महोत्सवात आलेच पाहिजे असे तर फर्मान नाही ना काढले? ज्यांना त्यांची बंधने पटतात ते जातील. नाही ते जाणार नाहीत. कदाचित त्यांचा गरबा दुथडी भरून वाहील किंवा ओस पडेल. लोक अन मंडळ पाहून घेतील. त्यात बाकीचे विषय घुसवण्यात काय अर्थ. आम्ही खरंच स्वातंत्र्य मानतो?

- श्रीपाद कोठे

४ ऑक्टोबर २०१५

रविवार, २ ऑक्टोबर, २०२२

दिनकर मनवर वाद

दिनकर मनवर यांच्या कुठल्याशा कवितेवरून गदारोळ चालला आहे. त्याला अनुसरून-

१) लिंगभावाचे शब्द, भाषा वापरल्याशिवाय दु:ख, वेदना, अभाव मांडता येत नाहीत का?

२) अशा प्रकारे अंगात आल्यासारखे न करता लिहिणारे आणि आव न आणता समाजासाठी खूप काही भरीव करणारे नाहीत का?

३) अशी भाषा वापरणे हा हक्क असू शकतो का?

४) बोलण्याच्या, लिहिण्याच्या ओघात, संतापाच्या ओघात, तिरीमिरीत अथवा भावनांच्या आत्यंतिक आवेगात अशी भाषा वापरणे समजून घेण्यासारखे असले तरीही; रोज रतीब घातल्यासारखे असंबद्ध, दर्जाहीन लिहिणे, बोलणे बरळत राहणे आणि शेकडो लोकांनी झुंडीने त्यावर टिवल्याबावल्या करणे; ही कोणत्या अर्थाने सृजनशीलता असू शकते?

५) अत्यंत दर्जाहीन, सवय म्हणून मुर्खपणा करणारे, सवय म्हणूनच नव्हे तर जाणूनबुजून अर्वाच्य लिहिणारे, बोलणारे, ठरवून हे करणारे आणि त्यांचे झेंडे नाचवणारे; हे समाजरूपी आंब्याच्या आढीतील सडलेले आंबेच आहेत.

६) मानवी जीवनात सगळ्या गोष्टींना स्थान आहे. अपरिहार्यता म्हणून किंवा तसेही. अगदी घाण, अश्लीलता, नग्नता, क्रूरता, पांचटपणा आदींनाही. पण त्यांचे त्यांचे स्थान आहे. आम्हाला स्थान आणि स्थितीची मर्यादा मान्य नसून आम्हाला वाटेल तिथे, वाटेल तेवढे, वाटेल तसे, वाटेल तेव्हा करीत राहू; हे म्हणणे, त्यासाठी आग्रही असणे आणि त्या म्हणण्याला व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून उचलून धरणे ही बदमाशी आहे.

७) विधिनिषेधशून्यता म्हणजे सृजनशीलता असूच शकत नाही.

८) कोणालाही कुठेही घाण/ कचरा टाकण्याची, ओकण्याची परवानगी असू शकत नाही. तो हक्क तर असूच शकत नाही. घाण, कचरा, ओकाऱ्या; या शारीरिक असोत, मानसिक, बौद्धिक वा भावनिक असोत.

९) असे सडके आंबे कालप्रवाहात नेहमीच राहतात, पुढेही राहतीलच. पण ते असतात म्हणजे त्यांना राहूच दिले पाहिजे असे नाही.

१०) घाण होणे प्रकृतीचा स्वभाव असला तरीही घाण स्वच्छ करणे मानवी आणि दैवी आहे. मानवी आणि दैवी वृत्ती वाढल्याच पाहिजेत.

- श्रीपाद कोठे

३ ऑक्टोबर २०१८

कोणीही कोणाचं नसतं

कुसुमाग्रजांच्या नटसम्राट नाटकात एक वाक्य आहे - 'कोणीही कोणाचं नसतं.' खलील जिब्रानच्या प्रॉफेटच्या तोंडीही अशाच आशयाचं एक वाक्य आहे - 'तुमची मुलं तुमची नाहीत. तुमच्यातून आलेली आहेत.' आदि शंकराचार्य त्यांच्या निर्वाण षटकम स्तोत्रात हाच भाव व्यक्त करतात. परंतु तिघांच्याही प्रतिपादनात खूप मूलभूत फरक आहे. कुसुमाग्रज म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ असतो, कोणीतरी कोणाचं असलं पाहिजे. मानवी भावनांना अनुसरून व्यक्त केली गेलेली नटसम्राटाची निराशा ही अपेक्षा सुचवते. खलील जिब्रानचा प्रॉफेट जीवनाचं नागडं सत्य तत्वचिंतकाच्या अधिकाराने मानवाला समजावून सांगतो. आदि शंकराचार्य मानवी भावांच्या वर उठून, तत्वचिंतनाच्या सोपानावरून 'मी शिव आहे' हे अंतिम सत्य सांगतात. 'कोणीही कोणाचं नसतं' ही एकच गोष्ट कशी विविध रुपात असू शकते, तिचे अर्थ कसे वेगळाले असू शकतात हे यावरून समजून घेता येतं.

(आगामी लेखनातून)

- श्रीपाद कोठे

३ ऑक्टोबर २०२०

शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२

श्रद्धा अंधश्रद्धा

एका वाहिनीवर श्याम मानव विरुद्ध वर्तक सुरु होतं. अन त्याच वेळी दुसऱ्या एका वाहिनीवर फेसबुकच्या मार्क झुकरबर्गने पंतप्रधान मोदींशी झालेल्या गप्पांमध्ये उल्लेख केलेल्या `कैची' गावच्या `निमकरोली' बाबांची माहिती सुरु होती. झुकरबर्गला apple च्या स्टीव्ह जॉब्सने या बाबांकडे पाठवले होते.

विज्ञान तंत्रज्ञानाची चिकित्सक बुद्धी नसलेले किंवा पैसा हवा आहे पण तो मिळवण्याची अक्कल नसलेले लोक बाबांच्या नादी लागतात. अन बाबा वगैरे ढोंग असतं, असं प्रा, मानवांच्या प्रबोधनामुळे आम्ही समजतो. पण मार्क झुकरबर्ग किंवा स्टीव्ह जॉब्स यांच्याकडे चिकित्सक बुद्धी किंवा पैसा कमावण्याचे तंत्र अन कौशल्य नसेल असे काही वाटत नाही. मग कधीही न पाहिल्या देखलेल्या, भारतात सुद्धा ज्याच्या बद्दल माहिती नाही अशा बाबांकडे ते का आकर्षित झाले असतील? अन सगळ्या जगाला नाचवणारा हा झुक्या त्या पहाडातल्या आश्रमात काही दिवस का राहिला असेल? त्याला काय मिळालं असेल? हा काय चमत्कार असावा? की झुक्या पण लेकाचा आमच्यासारखा दुबळाच आहे म्हणायचा? काही कळत नाही.

फक्त एक निरीक्षण नोंदवलंय मित्रांनो.

- श्रीपाद कोठे

२ ऑक्टोबर २०१५

वैभवाची कल्पना

परवा विजयादशमीला सरसंघचालकांचे भाषण झाले. ते भाषण सुरु होते तेव्हापासूनच चर्चेला आणि प्रसार माध्यमांच्या मतप्रदर्शनाला सुरुवात झाली. ही चर्चा काही काळ चालेल. अनेक विषय होतेच. सुरक्षा, आजची परिस्थिती, रोहिंग्या, काश्मीर इत्यादी. हे सगळेच विषय महत्वाचे आहेतच. पण ते सगळे तातडीचे अन अल्पकाळाचे आहेत. एक विषय मात्र दीर्घ काळाचा, अधिक मुलभूत असा होता आणि स्वयंसेवकांच्या दृष्टीने मला तो जास्त महत्वाचा वाटतो. कारण अन्य विषय स्वरूप या दृष्टीनेही गुंतागुंतीचे आहेत. त्यात सामान्य व्यक्तीने प्रत्यक्षात करण्यासारखे खूप काही नाही. परंतु जो दीर्घकालीन विषय त्यांनी मांडला तो मात्र सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांना त्यात काही ना काही करण्यासारखे आहे. तो विषय होता- `विश्वविभव की व्याख्या नयी करेंगे'. त्या कार्यक्रमात झालेल्या सांघिक गीतातील ही एक ओळ. ही उद्धृत करून सरसंघचालक त्यावर बोलले. याची मस्करी होऊ शकेल, यावर टीकाटिप्पणी होऊ शकेल, यावर कुचाळकी होऊ शकेल. परंतु वैभवाची नवीन व्याख्या जगात स्थापित करण्याची गरज आणि संकेत या भाषणात त्यांनी दिले. त्या दिशेने प्रयत्नशील होणे हा स्वयंसेवक आणि अन्य समाजासाठीही खरा संदेश आहे.

- श्रीपाद कोठे

२ ऑक्टोबर २०१७

आपण इंग्रज होऊ नये

- इंग्रजांपासून मुक्ती मिळवल्यावर आपण इंग्रज होऊ नये. (महात्मा गांधी)

हे केवळ भाषा, रीतिरिवाज, वागणंबोलणं, खाणंपिणं, व्यवस्था यापुरतं नाही; तर दृष्टी, वृत्ती, विचार आणि तत्वज्ञान याला अनुलक्षून आहे.

*****

- माझ्या अशिक्षित परंतु समजूतदार आईने शिकवलं आहे की, माणसाला कर्तव्य असतात अधिकार नाही. (महात्मा गांधी - मानवी हक्काचा जाहीरनामा तयार करताना संयुक्त राष्ट्रसंघाने मत मागवले तेव्हा)

साम्यवाद, समाजवाद, लोकशाही, भांडवलशाही, आधुनिकता इत्यादी अधिकारावर भर देणारे विचार गांधींशी मेळ कसे खातील?

*****

'ताशकंद फाईल्स' पाहिला अन पुन्हा गांधी आठवले - 'आपण जी सभ्यता स्वीकारण्याच्या तयारीत आहोत ती राक्षसी सभ्यता आहे. ती एक दिवस जगाला खाऊन टाकील.' आज तीच सभ्यता स्वीकारून माणूस न्याय, शांति, सुख, समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. यात गांधींना पाण्यात पाहणारे आणि गांधींना डोक्यावर घेऊन नाचणारे दोघेही आहेत. केवळ सद्भाव आणि करुणा यांनी भागत नाही. जी समस्या आहे ती त्याहून खूप मूलभूत आहे. गांधींचं नाव घेण्याचा आग्रह असो की ते टाकून देण्याचा निर्धार असो. दोन्ही निरर्थक. मुळाचा, गाभ्याचा, तत्वाचा विचार करण्याची सुरुवात जेव्हा होईल ते खरं. मुळात विचार आणि अभ्यास यातही खूप फरक आहे. माणूस तर हा फरक समजून घेण्यापर्यंतही पोहोचलेला नाही. अजून खूप मोठा पल्ला आहे.

- श्रीपाद कोठे

२ ऑक्टोबर २०१९