शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

सुशांत सिंह आणि अध्यात्म

सुशांतसिंहबद्दल पाहत होतो. त्याच्या डायरीतील धार्मिक नोंदी, कबिराच्या ओळी इत्यादी. तसेही तो धार्मिक होता अशी चर्चा आहेच. हे मान्य करायलाही हरकत नसावी. पण इथे एक गोम आहे. म्हणजे कोणाच्याही बाबतीत, कोणत्याही संदर्भात इथे एक गोम असते/ असू शकते. ईश्वरी कृपा प्राप्त करून सगळं जग 'माझ्या मुठीत' आणण्याचा प्रयत्न केला जातो. तशी इच्छा बाळगली जाते. जग नियंत्रित करण्याची आस लागते. जग प्राप्त करण्याची अभिलाषा धरली जाते. 'आपणच ईश्वर आहोत. आपण काहीही करू शकतो', असा अद्वैत सिद्धांत पण साथीला घेतला जातो. पण हे आध्यात्म नाही हे लक्षात घेतले जात नाही. ईश्वरी कृपेने जग नियंत्रित करणे, जग मुठीत ठेवणे; ही शुद्ध जडवादी ऐहिकता आहे. त्यात ईश्वर वगैरे असला तरीही. ईश्वरी कृपेने जग मुठीतून सोडून देऊन, जगावरील असले नसलेले नियंत्रण सोडून देऊन, स्वतःला नियंत्रित करणे, म्हणजे आध्यात्म.

- जग नियंत्रित करण्यासाठी ईश्वरी कृपा म्हणजे ऐहिकता.

- स्वतःला नियंत्रित करण्यासाठी ईश्वरी कृपा म्हणजे आध्यात्म.

- श्रीपाद कोठे

१८ सप्टेंबर २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा