श्री गणेशाचे आता राजे झाले आहेत. लालबागच्या राजापासून वेगवेगळ्या गावांचे, शहरांचे, गल्ल्यांचे सुद्धा 'राजा'. प्रतिष्ठा होते ती 'राजा'ची, विसर्जन होते ते 'राजा'चे, दर्शन घेतात ते 'राजा'चं. सामान्य मनासाठी 'राजा' ही सगळ्यात म्हणजे सगळ्यात म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट हे ठीक आहे. पण श्री गणेश हे कोणत्याही 'राजा'पेक्षा खूप खूप मोठे आहेत. ते अब्जावधी राजे निर्माण करतात अन मोडीत काढतात. हे समजण्यासाठीच श्री गणेश भक्ती, आराधना, उपासना करायची असते. श्री गणेशाची भक्ती करून आपलं सामान्यत्व थोडं तरी ऊणं करायचं असतं. त्याऐवजी श्री गणेशालाच 'राजा' बनवणं बरंही नाही वाटत अन योग्यही. बरी अन योग्य न वाटणारी गोष्ट बदलायलाही काही हरकत नाही नं. आपल्या इथे म्हणतात की, सहज एखाद्याला नावाने हाक मारताना जरी देवाचं नाव तोंडी आलं तरी पुण्यसंचय होतो. इथे तर प्रत्यक्ष देवाचं नाव घेतानाही तोंडी 'राजा' येतं. पुण्यसंचय कसा होईल?
- श्रीपाद कोठे
२० सप्टेंबर २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा