शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२

विजया मेहता आणि तृप्ती देसाई

काल रात्री `पेस्तनजी' पाहिला. पुन्हा. पारशी कुटुंबावर आधारित हा चित्रपट. यात ब्रेक झाला की, दिग्दर्शक विजया मेहता यांचं मनोगत ऐकायला मिळत होतं. तो एक वेगळा आनंद होता. विजयाबाईंबद्दल बोलायलाच नको. त्यांचं दिग्दर्शन, बुद्धिमत्ता, क्षमता, कौशल्य, समज वादातीत आहेच. त्यांनी सांगितलं- `पारशी लोकांनी आम्हाला अमाप सहकार्य केलं. चित्रपट पूर्ण होईपर्यंत एका कुटुंबाने त्यांचं घर पूर्ण आम्हाला देऊन टाकलं होतं. पण त्यांच्या धार्मिक विधीत मात्र खूप व्रतस्थता असते. धार्मिक सोहोळा पाहायला कोणीही अन कितीही लोक जाऊ शकतात, पण ते एका विशिष्ट परिघाबाहेर. परिघाच्या आत ते लोक सोडून कोणालाही प्रवेश नाही. आम्हाला `उठमना' विधिचं चित्रीकरण करायचं होतं. पण त्यांनी सांगितलं की, तुम्हाला परिघाच्या आत येता येणार नाही. तुम्ही लोक खूप प्रामाणिक तळमळीने काम करता म्हणून परीघ थोडा लहान करू पण प्रत्यक्ष विधीच्या जागेपासून ३५ फुटावरूनच चित्रीकरण करता येईल. त्याच्या आत नाही. तुम्ही झूम करा किंवा काहीही करा. त्याच्या आत नाही.' विजयाबाई पुढे म्हणाल्या- `आम्हीही त्यांच्या म्हणण्याला होकार दिला. we must respect each other.'

मनात फक्त एकच विचार आला- आज जगाला विजया मेहता हव्या आहेत, तृप्ती देसाई नकोत.

- श्रीपाद कोठे

४ सप्टेंबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा