एका चर्चेत काँग्रेस प्रवक्त्याने म्हटले - संघाने प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात भाग घेतल्याचा पुरावा नसल्याचे भाजप सरकारने rti ला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.
या मुद्यावर मी काहीही टिप्पणी करणार नाही. पण एक मूलभूत मुद्दा, जो अनेक ठिकाणी लागू होतो. आजवर माणसांनी जे काही केले, आजही जे काही करीत आहे अन पुढेही करेल; ते करताना भविष्यात असे असे वाद होतील असा विचार करून त्याचे पुरावे सुरक्षित ठेवण्याचे काम होते का? अन समजा जपून ठेवले तरीही मानवी, नैसर्गिक वा उधई वगैरे सारख्या आपत्ती, पुरावे जपून ठेवणारे जग सोडून गेल्यानंतर अन्य लोकांना ते महत्वाचे न वाटून लावली जाणारी विल्हेवाट; अशा अनेक बाबी असतात. आणि समजा बरेच पुरावे, दस्तावेज असले तरीही अमुकच घडले असावे अन अमुकच पद्धतीने घडले असावे, असे कसे म्हणता येईल? अभ्यास, संशोधन, निष्कर्ष यांची आज जी पद्धत प्रचलित आहे त्यातील या भयंकर त्रुटी आहेत. पण तेच तेच मुद्दे रवंथ करण्यातच बुद्धी खर्च करायची असेल तर त्याला उपाय नाही. मूळ गृहितकांची चिकित्सा हा आजचा मूळ बौद्धिक प्रश्न आहे.
- श्रीपाद कोठे
२० सप्टेंबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा