सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

अद्वैत हाच भारतीय विचार

अद्वैत हा खऱ्या अर्थाने भारतीय विचार आहे. किंबहुना असं म्हणता येईल की, भारतीय विचारधारेची ती पूर्णता आहे. अन्य म्हणजे - द्वैत, त्रैत, विशिष्टद्वैत, ऐहिक, पारलौकिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक; असे सगळे विचारधन यात भारतीय आणि अभारतीय म्हणून फार फरक नाही. अगदीच फरक नाही असे नाही. परंतु जो फरक आहे त्याचा आधार अथवा कारण अद्वैत वृत्ती (अद्वैत विचाराहून ही वेगळी) हेच आहे. हे नजरेआड करून जर विचार केला तर, भारतीय आणि अभारतीय विचारातील समस्या, मर्यादा, अडथळे; त्यांचे परिणाम; त्यांनी व्यवहाराला मिळणारे वळण; या सगळ्या बाबी कमीअधिक सारख्या आहेत. मानवी जीवनासाठी भारतीय चिंतन महत्त्वाचे, आवश्यक, उपयुक्त असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ, अद्वैत चिंतन असा असायला हवा. हां, मात्र अद्वैताचा नीट बोध मात्र आवश्यक आहे. 'आमचं दोघांचं अद्वैत आहे किंवा त्या दोघांचं अद्वैत आहे किंवा या सगळ्या गोष्टीत अद्वैत आहे' असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा अद्वैत बोध नीट नाही असाच त्याचा अर्थ होऊ शकतो. एकात्म मानववादाचे प्रतिपादन करताना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी हे विशेषत्वाने मांडले होते की, एकात्म मानववादासाठी (समजण्यासाठी आणि चरितार्थासाठी) अद्वैत बोध आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

२० सप्टेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा