सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२

Privacy

privacy हा मुलभूत अधिकार आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. माझं शरीर माझं आहे. त्यामुळे कोणते कपडे घालायचे हे मी ठरवेन. काय खायचं हे मी ठरवेन. असेही युक्तिवाद ऐकायला मिळाले. मात्र, हेल्मेट घालायचे की नाही हे मी ठरवेन, असा काही सूर ऐकू आला नाही. माझ्या शरीरावर माझा हक्क मान्य करायचा तर हेल्मेटसक्ती कशी योग्य ठरू शकते? कपडे वा खाणेपिणे यांनी काही सामाजिक उपद्रव तरी होऊ शकतो. हेल्मेट परिधान न करण्याने तर तेही नाही. तेव्हा हेल्मेट विरोधकांनी privacy अधिकाराच्या अंतर्गत हेल्मेटसक्तीला आव्हान द्यायला काय हरकत आहे?

- श्रीपाद कोठे

६ सप्टेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा