श्री रामकृष्ण परमहंस म्हणत असत, `मुंगीच्या पायातील घुंगराचा आवाज सुद्धा ईश्वराला ऐकू जातो.' महात्मा कबीराचाही याच आशयाचा दोहा आहे. संत महात्म्यांनी आम्हाला हे समजावले तरीही आम्ही देवभक्ती करताना आवाज किती जास्तीत जास्त वाढवता येईल आणि किती अधिकाधिक वेळ त्यासाठी वापरता येईल हेच पाहतो. असे का? खरे तर मुक्याने बोलतो तेव्हाच ईश्वराशी खरा संवाद होतो. पोलिसांनी परवानगी दिली असली तरीही आम्ही डीजे वगैरे लावणारच नाही, असे भक्त लोक कधी सांगू लागतील? मोठ्या आवाजाने शक्ती वाढत नाही, उलट शक्तीचा क्षय होतो.
- श्रीपाद कोठे
१० सप्टेंबर २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा