सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२

संघ आणि भाजप

संघाची तालिबानशी तुलना केल्यामुळे जावेद अख्तर यांचे चित्रपट चालू देणार नाही, असं भाजपने म्हटल्याचं वृत्त वाचण्यात आलं. माझ्या समजुतीप्रमाणे, संघाची ही पद्धत नाही. संघावरील टीकेमुळे व्यथित होणाऱ्या स्वयंसेवकांनाही भाजपची भूमिका योग्य वाटू शकते. संघाबद्दलचाच विषय असल्याने ही संघाचीच भूमिका आहे असाही समज होऊ शकतो. तसेही भाजपच्या मुखाने संघच बोलतो ही जनसाधारणांची समज आहेच. ती चुकीची आहे असं म्हणूनही ती बदलता मात्र येत नाही. हिंदुत्वाची संघधारा आज एका नवीन वळणावर उभी आहे असे वाटते. (हा विषय सार्वजनिक चर्चेचा आहे का? आदी प्रश्न उपस्थित होऊ शकतात. पण सगळंच चव्हाट्यावर येण्याच्या आणि त्यावर विचार करीकरीपर्यंत त्याचे परिणाम होऊन जाण्याचा हा काळ आहे. या काळात असे प्रश्न अर्थहीन ठरतात.)

- श्रीपाद कोठे

६ सप्टेंबर २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा