खूप काम,
खूप पैसा,
खूप नाव,
खूप प्रसिद्धी,
खूप घरे,
खूप गाड्या,
खूप पुस्तके,
खूप लिहिणे,
खूप वाचणे,
खूप बोलणे,
खूप चालणे,
खूप फिरणे,
खूप पाहणे,
खूप माणसे,
खूप शांतता,
खूप मस्ती,
खूप खाणे,
खूप व्यायाम,
... ... ... ... ...
यादी कितीही वाढेल.
यातलं 'खूप' हीच फक्त समस्या आहे.
तीन गोष्टी -
१) 'खूप'ला अंत नाही. त्यामुळे समाधानाचा प्रश्नच येत नाही. कायम असमाधान.
२) यातूनच स्पर्धा, संघर्ष, असमानता, द्वेष, आकस इत्यादी इत्यादी इत्यादी. शांततेचा अभाव. ताण, नैराश्य, प्रकृतीच्या तक्रारी इत्यादी. याचा गैरफायदा घेणाऱ्या संघटित शक्तींचा उदय आणि त्यांचे साम्राज्य. या शक्तींचा जीवनाला विळखा.
३) 'खूप'च्या यादीतील कोणत्याही गोष्टीला स्वतंत्रपणे ना अस्तित्व ना अर्थ. या सगळ्या गोष्टींना जीवनाच्या संदर्भात अर्थ. 'खूप' म्हटल्यानंतर त्या त्या गोष्टींना महत्व आणि प्राधान्य मिळतं, दिलं जातं. त्यातून त्या जीवनापासून दूर होतात. परिणामी जीवन आणि ती ती गोष्ट दोन्ही अर्थहीन होतात.
- श्रीपाद कोठे
१७ सप्टेंबर २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा