या देशाला जिंकायचं असेल तर त्याचा धर्म, संस्कृती, मूल्य, आदर्श यांच्यावर आघात करायला हवा; हे मेकॉलेचं मत जगजाहीर आहे. जगावर राज्य करणाऱ्या इंग्लंडचा प्रतिनिधी असूनही पैसा, सैन्यबळ, सत्ता यांनी भारत जिंकता येणार नाही हे त्याचे मत होते. म्हणजेच भारताचा चिरंतनत्वाचा आधार धर्म, संस्कृती, मूल्य, आदर्श हा होता. पैसा, सैन्यबळ, सत्ता हा चिरंतनत्वाचा आधार होऊ शकत नाही. आज किमान आमच्या मनात आम्ही या सत्याला तिलांजली दिली आहे का? स्वाभाविक दुसरा प्रश्न येतो - भारत भारत राहील का? तिसरा प्रश्न येतो - भारत किती काळ भारत राहील? चौथा प्रश्न येतो - भारत भारत राहिला नाही तर मानव मानव राहील का?
- श्रीपाद कोठे
१७ सप्टेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा