दोन रात्री orange city hospital ला काढाव्या लागल्या. हॉस्पिटलच्या फाटकाजवळ सकाळी ५.३० वाजता एक चहावाला येतो. त्याने बनवलेला पहिला चहा पिण्याचाही योग आला. त्याचं दिवसाचं चहाचं पहिलं भांडं शेगडीवरून उतरलं की, तो फक्त एका पेल्यात चहा ओततो. मग पेलाभर पाणी अन पेलाभर चहा जमिनीवर टाकतो. त्यानंतर गिऱ्हाईकी सुरु. श्रद्धा ही गोष्ट किती खोलवर रुजली आहे आपल्यात. जणू आपल्या गुणसुत्रांमधूनच येते आपल्यापर्यंत. याच श्रद्धेने मानवाला जगवले अन वाढवले आहे. श्रद्धेला नमन असो.
- श्रीपाद कोठे
२२ सप्टेंबर २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा