बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

अर्थ मानसिकता

गरज, आनंद, चैन आणि उधळपट्टी या अर्थमानसिकतेच्या चार अवस्था आहेत. गरज आणि आनंद यांचा संबंध जीवनाशी आहे, तर चैन आणि उधळपट्टी स्वत:च्या आणि बाकीच्यांच्याही जीवनाला अडचणीत टाकणारे आहेत. मुख्य म्हणजे या चारही अवस्था अतिशय व्यक्तीकेंद्रित आहेत. त्यामुळेच यांचा सखोल, साधकबाधक विचार करून; योग्य अर्थमानसिकता जोपासून; त्यानुसार जगणाऱ्या माणसांची संख्या जेवढी अधिक तेवढे अर्थकारण आणि सामाजिक जीवन सुखी, समाधानी, शांततापूर्ण राहू शकते. व्यवस्था, कायदे, नियम, रचना हे सगळे नंतरचे विषय. आपण यासाठी किती सक्षम आहोत?

- श्रीपाद कोठे

२२ सप्टेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा