अत्याधुनिक हवामान यंत्रणा असूनही वादळावर वादळे अमेरिकेला तडाखे देत आहेत.
भूगर्भ संशोधनात प्रचंड संशोधन होऊनही भूकंप शेकडो, हजारो बळी घेतोच आहे.
मानसशास्त्रात आणि व्यवस्थापन शास्त्रात नवनवे प्रयोग, संशोधने, समुपदेशने होत असतानाही `मनोरोग' हा जगातला सगळ्यात मोठा रोग होऊ पाहतो आहे.
व्यवस्थापन शास्त्रात नवनवे प्रयोग, संशोधने होऊनही सगळ्या अर्थव्यवस्था डबघाईला येत आहेत.
तरीही- आमच्या सगळ्या त्रासाचं, अडथळे आणि अडचणीचं खापर आमचा धर्म, परंपरा आणि ते मानणाऱ्या लोकांवर फोडण्यात दिवसरात्र आनंद अनुभवणाऱ्या `आत्मनिंदक' आणि `आत्मवंचकांचा' विजय असो.
- श्रीपाद कोठे
२० सप्टेंबर २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा