कठोर नियम आणि दंड यांनी माणूस चांगला होत असता तर - इस्लाम आज जगापुढील संकट झाला नसता, रशियाला पेरेसरॉईका ग्लास्नोस्ट आणि गोर्बाचेव्हची गरज पडली नसती, चीनपुढे कोणतीच समस्या उरली नसती, हिटलर आणि किम जोंग आदर्श महापुरुष ठरले असते.
- श्रीपाद कोठे
५ सप्टेंबर २०१९
चांगला जरूर होत नसेल पण शिस्त नक्की च येते।
हा प्रश्न संविधान निर्मात्यांना देखील पडला नसेल काय...?
चाणक्याने अर्थशास्त्र नामक ग्रंथ रचला. त्यात अनेक नियमावली आणि संहितांचा उल्लेख आढळतो, राजा, न्याय शास्त्र, समाज आणि नीतिमुल्यांचा आदर न बाळगणारांना धाक बसवून राज्यशासनाची घडी बसवून दिली, ती कशा साठी...?
स्वतः होवून नियम पाळणे, हेच उत्तम. एका विशिष्ट अनुशासनात राहण्याची संवय झाल्यास कालांतराने समाजात सुधारणा दिसून येतात.
शंभर सव्वाशे वर्षांपुर्वी लोकांना रस्त्याच्या डाव्या बाजूने चालण्याची संवय नव्हती, घड्याळ नव्हते तेंव्हा लोकांना वेळेचे बंधन पाळणे जमत नव्हते, आज ती स्थिती नाही.
आज काही लोक संवयीने कार्यालयात वेळेवर जातात, तर काही जण नियमाच्या धाकाने वेळ पाळतात.
मुजोर लोक नियम करा वा शिक्षा करा, ते नियम पाळतच नाहीत.
माणूस चांगला होण्यासाठी दंड व नियम नसतात. सगळ्यांना त्रास होऊ नये म्हणून व सगळ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी असतात. नियम पाळले तर दंड भरावा लागणार नाही
मला वाटतं ही पोस्ट नीट समजून घ्यायला हवी. सविस्तर लिहायला जमेल तेव्हा पाहू पण काही मुद्दे -
नियम, कायदे नसावेत असं म्हटलेलं नाही. अन तशी स्थिती व्यवहारात येणं कठीणच. त्यामुळे नियम, कायदे असायलाच हवेत, असतातच, असतीलही. पण नियम, कायदे करताना किती विचार केला आहे, त्याची अंमलबजावणी आणि मर्यादा, हेतू व्यतिरिक्त अन्य अनेक बाबी; हे लक्षात घेतले नाही तर ते चुकीचे ठरते. त्रुटी, चूक, गुन्हा, बदमाशी, अपरिहार्यता, मर्यादा; या आणि यासारख्या गोष्टी लक्षात न घेता जेव्हा नियम आणि कायद्यांचा विचार होतो तेव्हा त्याचे मुळीच समर्थन करता येत नाही. तसे ते केले जाते तेव्हा ती दांभिकता आणि मग्रुरी असते. न्याय, न्याय व्यवस्था इत्यादीचाही यात विचार आहे. दोन गोष्टी अगदी कोरून ठेवल्या पाहिजेत - चाणक्य सहित कोणीही अखेरचा बिंदू नाही आणि the worm also turns हा इंग्रजीतील वाक्प्रचार. ज्या वर्तमान संदर्भात ही पोस्ट आहे, त्या मोटर वाहन कायद्यात विचारांची शून्यता दिसते हे माझे विचारपूर्ण स्पष्ट मत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा