शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२

मनाचे उन्नयन

- जुगार आणि स्त्रीची विटंबना (अपमान नव्हे) यातून महाभारत घडलं. जुगार आणि स्त्रीची विटंबना आजही सुरू आहे.

- त्या त्या वेळी संघर्ष आवश्यक असला तरीही, संघर्षाने मूळ प्रश्न सुटत नाही.

- मानवी मनाचं उन्नयन जेवढं अधिक तेवढं जीवन सुखी, समाधानी.

- कित्येक युगं लोटली. मनाच्या उन्नयनाकडे अधिक लक्ष देण्याची, संघर्षाच्या अन शांततेच्या काळातही त्यावर भर देण्याची गरज माणसाला अजून मनापासून पटत नाही.

- mankind is content with flexing muscles.

- शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा, तसेच मनाच्या उन्नयनाची जबाबदारी दुसऱ्यांनी उचलावी. हाच आहे मानवी प्रगतीचा सारांश.

- श्रीपाद कोठे

१० सप्टेंबर २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा