शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

पबजीवर बंदी

पबजी वगैरेवर बंदी घातली. अतिशय स्वागतार्ह. पण हे पाऊल फार पूर्वीच उचलता आलं असतं. का नाही उचललं, हा प्रश्न आहेच. अनेक मुलांनी गमावलेले जीव हा आधारही होता. शिवाय कोणीही त्याला विरोध केला नसता. बहुतेक सगळ्या ऍपबद्दल असंच म्हणता येईल. शिवाय अन्य वस्तूंप्रमाणे या ऍप्सनी काही अडलंही नसतं. चीनला आर्थिक फटका तर बसलाच असता. ऍप्सवेड्या तरुणांनी दुसरं काही करण्याचा विचार केला असता. पण तसं झालं नाही. ठीक आहे देर आये दुरुस्त आये.

(भाजप समर्थकांनी माफ करावं.)

- श्रीपाद कोठे

३ सप्टेंबर २०२०


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा