भगवान श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर माऊली आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस एकत्रितपणे साजरा होण्याचा योगायोग आज आला आहे. या सगळ्यांना विनम्र प्रणाम. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त आज शिक्षक दिनही आहे. त्यानिमित्त सगळ्या शिक्षकांना विनम्र प्रणाम.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आदर्श शिक्षक होते. भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. अन त्यासोबतच महान तत्वज्ञ अन विचारवंतही होते. विज्ञानी होण्याची इच्छा असलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन योगायोगाने तत्वज्ञानी झाले. मनाविरुद्ध होणारी एखादी गोष्ट सुद्धा आपल्याला आपल्या जीवन ध्येयाकडे कशी घेऊन जाते याचे ते उदाहरण होते. माहिती आणि दृष्टीकोनाच्या अभावी पाश्चात्य विचारवंत हिंदू तत्वज्ञान, हिंदू चिंतन, हिंदू जीवन मूल्ये यांच्यावर टीका करतात किंवा त्याचे विपरीत अर्थ लावतात. त्याला उत्तर देण्यासाठी आणि विचारांना योग्य दिशा देण्यासाठी त्यांनी आपली सगळी बुद्धिमत्ता अन कौशल्य पणाला लावले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे हिंदुत्वाचे प्रखर प्रवक्ताही होते. हिंदू तत्वज्ञानावर त्यांनी विपुल लेखनही केले आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर-
`The challenge of Christian critics impelled me to make a study of Hinduism and find out what is living and what is dead in it. My pride as a Hindu, roused by the enterprise and eloquence of Swami Vivekananda, was deeply hurt by the treatment accorded to Hinduism in missionary institutions.'
त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी १९२६ साली लिहिलेले The Hindu View of Life हे पुस्तक.
http://isites.harvard.edu/fs/docs/icb.topic1172135.files/13047494-A-Hindu-View-of-Life-Dr-S-Radhakrishnan.pdf
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा