वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या कारणांनी अमेरिकेचं कौतुक, आकर्षण, ओढ असते. तसंही जगभरात अमेरिकेच्या संपन्नतेचा प्रभाव आहेच. मी काही अमेरिका विरोधी नाही पण सहज मनात आलं - एवढं काय अमेरिका अमेरिका. अमेरिकेपेक्षा अर्धी जमीन असूनही अमेरिकेच्या लोकसंख्येएवढे (कदाचित त्याहून जास्तच) लोक भारतातही सुस्थितीत आहेत. शिवाय त्यांच्या लोकसंख्येच्या दीड ते दोन पट लोक वेगवेगळ्या स्तरांवर जगत आहेत. हा स्तर योग्य आणि समाधानाचा नसला तरीही हे सगळे लोक अगदीच नरकात नाहीत. याचा निष्कर्ष काढायचा तर तो अगदीच निराशाजनक म्हणता येणार नाही. शिवाय अमेरिकेला डोक्यावर घेण्याचीही गरज वाटत नाही. तरीही आपलं आणि बाकीच्यांचंही perception नकारात्मक असतं. कुछ तो गडबड है.
- श्रीपाद कोठे
२२ सप्टेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा