मृतदेह विकून जमवले १०० कोटी
आयएसआयएसची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. सर्वशक्तीमान अमेरिकेच्या अध्यक्षांपासून तर छोटेमोठे सगळे देश त्या संघटनेमुळे चिंतेत आहेत. त्या आयएसआयएसचा प्रमुख असलेला बगदादी पैसा कसा जमवतो? आश्चर्य वाटेल, पण तो पैसा मिळवतो मृतदेह विकून. आजवर क्रूरतेच्या अनेक कहाण्या जगाने पाहिलेल्या, ऐकलेल्या आहेत. लाखो लोकांना पापणीही हलू न देता यमसदनी पाठवणारे अनेक क्रूरकर्मा जगाने पाहिले आहेत. हिटलर, इदी अमीन, स्टालीन, पोल पॉट, गद्दाफी, मुगाबे, पाट्रीक लुमुम्बा अशी कितीतरी नावे; अगदी एका शतकातील. पण त्यांच्याही संबंधात मृतदेह विकण्याचा प्रकार कधी पाहण्यात, ऐकण्यात, वाचण्यात आला नाही. बगदादी मात्र त्या सर्वांवर ताण करणार अशी चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने सिरीयाच्या २५० लोकांचे शिरकाण केले. त्यांना नि:शस्त्र एका रांगेत उभे करून गोळ्या घातल्या. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना निरोप पाठवले- तुमच्या माणसाचे शव आम्ही तुम्हाला अंत्यसंस्कारासाठी देऊ. सोबत त्या मृतदेहाच्या किंमतीदेखील सांगितल्या. स्वाभाविकच अनेकांनी आपल्या आप्तांचे मृतदेह स्वीकारले आणि अबू बकर अल बगदादीने मृतदेह विकून थोडेथोडके नव्हे सुमारे १०० कोटी रुपये उभे केले. अमेरिकेला टक्कर देणे किंवा इस्लामी साम्राज्य उभे करणे यासाठी ही रक्कम म्हणजे `दरिया मे खसखस'. त्यामुळे असे प्रकार यानंतरही पाहायला मिळणार नाहीत असे नाही.
वेळी अवेळी `भगवा आतंकवाद'च्या नावाने गळा काढणाऱ्या सगळ्यांनी प्रथम आतंकवाद काय आणि कसा असतो ते समजून घ्यावे. बगदादीच्या वरील कृत्यातून त्याची थोडीफार कल्पना येऊ शकेल. `ते तसे वागतात म्हणून आपणही तसेच वागावे काय?' असे त्यांच्याच सुरात सूर मिसळून गळे काढणाऱ्या तथाकथित बुद्धीवाद्यांनीही आतंकवादाचा अर्थ आणि आशय आधी समजून घ्यावा.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २० सप्टेंबर २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा