रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

आचरट निखिल वागळे

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर जे काही विचारमंथन झाले त्यावेळी पुरोगामी विचारवंतांच्या प्रामाणिकपणाबद्दल मी व्यक्त केलेली शंका इतक्या लवकर खरी होईल असे मलासुद्धा वाटले नव्हते. संदर्भ कोणताही असो, या लोकांचा हिंदूविरोधी वा धर्मविरोधी कार्यक्रम लपून राहत नाही. मदरश्यांना अनुदान देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावरून झालेल्या चर्चेत तेच दिसून आले. आचरट निखिल वागळेने आपल्या अकलेचे तारे तोडलेच. प्रश्न होता, मदरश्यांना अनुदानाचा. स्वाभाविकच त्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक बाजूंची चर्चा झाली. मदरशातील शिक्षण यावरही चर्चा झाली. शिवसेनेच्या रावते यांनी सूचना केली की, मदरसे बंद करून त्यांना आश्रमशाळा असा दर्जा द्यावा. भाजपचे माधव भंडारी यांनी सूचना केली की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा असतात त्या अधिक चांगल्या करून मुस्लिम मुले-मुली त्यात जातील अशी व्यवस्था करायला हवी. त्यामुळे ते मुख्य प्रवाहात येतील. त्यावर सर्वज्ञानी वागळेंनी काय म्हणावे? ते म्हणाले, तुम्ही वेद पाठशाळा बंद करायला तयार आहात का सांगा? मुळात कोणीही इस्लामचे शिक्षण बंद करावे असे म्हटलेले नव्हते. पण त्याचा सोयीस्कर अर्थ काढून वेद पाठशाळा बंद करण्याची सूचना काय दर्शवते? वेद पाठशालांना काही सरकारी अनुदान मिळत नाही. त्यामुळे मुद्दाच गैरलागू आहे. दुसरे म्हणजे इस्लाम आणि हिंदू अशी तुलनाच होऊ शकत नाही. अगदी, हिंदुत्वाचा दुरान्वयानेही ज्यांच्यावर आरोप होत नाही, वा होऊ शकत नाही असे डॉ. आंबेडकर, नरहर कुरुंदकर, आचार्य रजनीश वा अन्य अनेक भारतातील वा भारताबाहेरील अभ्यासक, चिंतक यांनी इस्लामचे जे विश्लेषण केले ते स्वीकारण्याची या ढोंगी लोकांची तयारी नाही. वेदांनी तर `आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत:' (संपूर्ण विश्वातून सर्व दिशांनी मंगल विचार आमच्याकडे येवोत) अशीच प्रार्थना केली आहे. थोडीशी अक्कल असणारा गाढव सुद्धा स्वप्नातही हिंदू धर्म असहिष्णू आहे वा हिंदू धर्माची शिकवण असहिष्णू आहे असे म्हणणार नाही. पण सोने आणि विष्ठा दोन्हीही सारखेच आहे असे दाखवले तरच ती समानता, अशी या पुरोगाम्यांची कल्पना आहे. तत्व आणि व्यवहार हा झगडा अनादी काळापासून सुरूच आहे. त्यासाठीच मानवी सभ्यतेची धडपड सुरु आहे. तो एक संपूर्ण वेगळा विषय आहे. तसेच धार्मिकता आणि इहवाद याचेही. माणसाला (केवळ हिंदूंना नव्हे) नीतिमान बनवण्यात इहवादापेक्षा धार्मिकतेनेच आजवर मोठी भूमिका बजावली आहे. १९५० मध्ये इहवादी राज्यघटना स्वीकारल्यानंतरही सुमारे सहा वर्षे चिंतन केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला होता. इहवादी घटना देणाऱ्या आंबेडकरांनी धर्माची आवश्यकता सुद्धा आग्रहाने प्रतिपादन केली आहे. परंतु विचार या गोष्टीशी काहीही देणेघेणे नसलेल्या निखिल वागळेने याचा विचार का करावा हाही प्रश्नच आहे. मुद्दा फक्त एवढाच आहे की, त्याच्यासारखे विद्वान(!!!) आपली हिंदूविरोधी आणि धर्मविरोधी मळमळ ओकत राहून आणखी किती घाण करून ठेवणार आहेत? त्यांचा हा आचरटपणा थांबव रे देवा.

- श्रीपाद कोठे

५ सप्टेंबर २०१३


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा