जुन्या किल्ल्यांच्या वापरावरून सध्या चर्चा सुरू आहे. सरकारनेही बचावात्मक भूमिका घेतली आहे. या अनुषंगाने एक प्रश्न मनात येतो की, अस्मिता आणि अस्मितेशी जोडलेल्या वस्तू, वास्तू, नावे इत्यादींचे महत्व किती? या साऱ्यात गुरफटायचे किती? ही पृथ्वी 'विपुला' आहे. तिच्या निर्मितीपासूनच तिने कर्मवीर, ज्ञानी, पराक्रमी, त्यागी अशा अगणित स्त्री पुरुषांना जन्म दिला आहे. आजही देते आहे आणि भविष्यातही देईल. प्रत्येकाला अनुयायी असतातच. प्रत्येकाचे कमीअधिक कर्तृत्व असतेच, योगदान असतेच. त्याविषयी कृतज्ञता बाळगणे एक गोष्ट आणि प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी जतन करण्याचा अट्टाहास ही वेगळी गोष्ट आहे. अशी वेळ न येवो की, पृथ्वी फक्त स्मारकांनी भरून जाईल आणि माणसांना जागाच उरणार नाही. भूतकाळाचे सिंहावलोकन करायचे असते त्यात गुंतायचे नसते आणि त्याचे अवास्तव दैवतीकरण करायचे नसते हे समजून घ्यायला हवे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ९ सप्टेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा